ढोल ताशांच्या गजरात प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे घोडपेठ येते जंगी स्वागत

– दिनेश चोखारे आणि अनिल धानोरकर यांची प्रामुख्याने उपस्थित

चंद्रपूर :- काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचेसह अन्य मान्यवर चंद्रपूर येथील विभागीय आढावा बैठकीला येत असतांना घोडपेठ येथे सर्व मान्यवरांचे दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, महाराष्ट्र संचालक तथा चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक, जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश दादापाटील चोखारे यांनी सर्व मान्यवरांचे शाल, बुके देऊन स्वागत केले. याच्यासोबत भद्रावती नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांची उपस्थिती होती.

काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा दौरा असल्याचे समजल्यावर घोडपेठ येते सकाळपासूनच कार्यकर्त्यांची रेलचेल वाढली होती. वाहनाच्या ताफ्याने विमानतळावरून चंद्रपूर जिल्हाच्या दिशेने निघाले असता घोडपेठ येथील बस स्टॉप समोर ढोल ताशाच्या गजरात व फटाक्याच्या आवाजात महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला व काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले या दोन्ही बड्या नेत्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, यावेळी जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. जागी स्वागतानंतर चंद्रपूर येथील आढावा बैठकीसाठी रवाना झाले.

यावेळी घोडपेठ सरपंच अनिल खडके, अशोक येरगुडे, ग्रामपंचायत गटनेता ईश्वर निखाडे, मुन्ना रायपुरे, ग्रामपंचायत सदस्य ज्योती मोरे, कविता शेळके ज्योती खडके, विनोद मूटपल्लीवार,सुनील खडके अनिता देवगडे, नलू मडावी कांता बोबडे, आदीसह बहुसंख्याक नागरिक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

“एक पेड माँ के नाम” उपक्रमांतर्गत सहा ठिकणी वृक्षारोपण

Tue Sep 24 , 2024
– आयुक्त डॉ. चौधरी यांनी आरपीटीएस परिसरातून केली उपक्रमाची सुरुवात   नागपूर :- केंद्रीय गृह निर्माण तथा शहरी कार्य मंत्रालयाच्या स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ या संकल्पनेस अनुसरून राबविण्‍यात येणाऱ्या ‘स्वच्छता ही सेवा 2024’ या अभियानातील “एक पेड माँ के नाम” या उपक्रमाची आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे वृक्षारोपण करीत सुरुवात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com