नागपूर :-पोलीस ठाणे सायबर, नागपूर शहर येथे 01 जानेवारी 2024 ते 15 डिसेंबर 2024 या कालावधीत सायबर गुन्ह्यासबंधाने (ऑनलाईन फसवणुक) एकुण 144 गुन्हे दाखल असुन दाखल गुन्ह्यातोल फसवणुक रक्कम 50,06,69,072/- रू. पैकी फिज/लिन रक्कम 28,56,61,057/- रू. आहे. दाखल गुन्ह्याचे तपासात एकुण 33 परराज्यीय आरोपीतांना अटक केली असुन फिर्यादी यांना मा. न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्यांचे फसवणुक रकमेपैकी एकुण 3,75,55,999/- रू. रक्कम परत मिळवून देण्यात सायबर पोलीसांना यश आले आहे.
तसेच नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल (NCCRP Portal) तर आर्थिक फसवणुकीच्या एकुण 13014 तकारी मध्ये एकुण फसवणुक रक्कम 91,59,77,116/- रू. आहे. त्यापैकी तकारीमधे रु. 18,41,70,385/- रक्कम फिज / लिन करून तकारदार यांना मा. न्यायालयीन प्रक्रियेनंतर एकूण 2,72,28,942/- रू. परत मिळवून देण्यात सायबर पोलीसांना यश आले आहे.
तसेच सोशल मिडीया प्लॅटफॉर्म जसे Facebook, Whatsapp, Instagram, Google lers, X crop (Twitter), Telegram यावर महिला व बालकांचे बाबतीत वायरल पोस्ट/आक्षेपार्ह पोस्ट सबंधाने एकुण 759 तकारी प्राप्त असुन सदर तकारीची तात्काळ दखल घेवून अशा आक्षेपार्ह पोस्ट डिलीट करण्यात आलेल्या आहेत.
उपरोक्त कामगीरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय पाटील, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, नागपूर शहर, लोहीत मतानी, पोलीस उप आयुक्त, सायबर तथा परिमंडळ क. 1. नागपूर शहर याचे मार्गदर्शनात अमित डोळस, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अमोल देशमुख, पोलीस निरीक्षक व सायबर टिम यांचे सहकार्याने तांत्रीक कौशल्याचा वापर करून उत्कृष्ट कामगीरी गार पाडली आहे.