यवतमाळ :- भारतीय सैन्य दलात अग्निवीर, अग्निवीर महिला, मिलीटरी पोलिस, नर्सिंग असिस्टंट व नर्सिंग असिस्टंट पशुवैद्यकीय, ज्युनियर कमिशन अधिकारी खानपान, ज्युनियर कमिशन अधिकारी धार्मीक गुरु, शिक्षा सेवा कोर हवालदार शिपाई फर्मा व हवालदार अशा विविध पदाची भरती घेण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ईच्छूक उमेदवारांसाठी अधिक माहिती www.joinindianarmy.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांकरीता ऑनलाईन नोंदणी दिनांक 12 मार्च पासून सुरू झालेली असून शेवटची दि. 10 एप्रिल आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी नोंदणी करून अग्निवीर भरती तसेच विविध पदाची सैन्यात भरतीद्वारे मिळालेल्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुदर्शन गायकवाड यांनी केले आहे.