यवतमाळ :- जिल्ह्यातील 19 हजार 833 ग्रामपंचायतींची थकीत गृहकर व पाणीकराची प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ठेवण्यात आली होती. या थकीत रक्कमेबाबत आपसी समझोता झाल्याने तब्बल 1 कोटी 56 लाख रुपयांची वसूली लोकअदालतमध्ये झाली आहे.
या लोकअदालतमध्ये यवतमाळ पंचायत समितीमध्ये 2963 प्रकरणे ठेवण्यात आली होती. या प्रकरणांमध्ये 19 लाख 89 हजार इतकी गृहकर व पाणीकर वसूली झाले. कळंब मध्ये 1064 प्रकरणांमध्ये 18 लाख 35 हजार इतकी वसूली झाली आहे. राळेगावमध्ये 322 प्रकरणे तर 4 लाख 74 हजार वसूली, बाभूळगाव 1255 प्रकरणे तर 6 लाख 10 वसूली, नेरमध्ये 1256 प्रकरणे, 6 लाख 54 हजार वसूली, दारव्हा 632 प्रकरणे, 2 लाख 70 हजार वसूली, दिग्रस 2063 प्रकरणे, 11 लाख 60 हजार वसूली, पुसद 1124 प्रकरणे, 13 लाख 48 हजार वसूली, उमरखेडमध्ये 345 प्रकरणे 3 लाख 13 हजार वसूली, महागांव 581 प्रकरणे 1 लाख 40 हजार वसूली, आर्णी 2730 प्रकरणे 6 लाख 11 हजार इतकी वसूली झाली आहे.
घाटंजीमध्ये 285 प्रकरणे 1 लाख 87 हजार वसूली, पांढरकवडा 3418 प्रकरणे 42 लाख 43 वसूली, वणी 485 प्रकरणे 7 लाख वसूली, मारेगाव मध्ये 772 प्रकरणे 6 लाख 60 हजार वसूली, झरी जामणी 568 प्रकरणे 4 लाख 83 हजाराची गृहकर व पाणीकराची वसूली झाली आहे. याप्रमाणे एकून 19 हजार 863 प्रकरणांमध्ये 1 कोटी 56 लाख इतकी गृहकर व पाणीकराची वसूली झाली आहे.
लोकअदालतीमध्ये प्रकरणे दाखल करुन वसुली करण्याकरीता मुख्य कार्यकारी अधिकरी मंदार पत्की व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे 16 पंचायत समिती मधील गट विकास अधिकारी व पंचायत विस्तार अधिकारी यांनी प्रकरणांचा पाठपुरावा प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यासाठी मोलाचे योगदान दिले. यासाठी जिल्हा सत्र न्यायालय व तालुका सत्र न्यायालयाचे सहकार्य व मार्गदर्शन देखील लाभले, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कळविले आहे.