नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. मंगळवार (17) रोजी शोध पथकाने ८५ प्रकरणांची नोंद करून ६३, ८०० रुपयाचा दंड वसूल केला.
शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत २७ प्रकरणांची नोंद करून १०,८०० रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत ६ प्रकरणांची नोंद करून ६00 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ४ प्रकरणांची नोंद करून १६०० रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींगचे हॉटेल, सिनेमा हॉल, मंगलकार्यालय, कॅटरस, सर्व्हीस प्रोव्हायडर आदींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा आशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत १ प्रकरणांची नोंद करून २००० रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तीक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत ६ प्रकरणांची नोंद करून १६००० रुपयांची वसुली करण्यात आली. वैद्यकिय व्यवसायकांनी बॉयोमेडीकल वेस्ट सर्वसाधारण कचऱ्यात टाकणे या अंतर्गत १ प्रकरणांची नोंद करून रु २०००० दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक रस्ता,फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा/साठवणे, प्रथम अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत १ प्रकरणांची नोंद करून रु १००० दंड वसूल करण्यात आला. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास ३४ प्रकरणांची नोंद करून रु ६८०० दंड वसूल करण्यात आला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास ५ प्रकरणांची नोंद करून रु ५००० दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.