सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या ६३ प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. बुधवार (ता.३) रोजी उपद्रव शोध पथकाने ६३ प्रकरणांची नोंद करून ३४,७०० रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत १९ प्रकरणांची नोंद करून ७६०० रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०७ प्रकरणांची नोंद करून ७०० रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे याअंतर्गत ०३ प्रकरणांची नोंद करून १२०० रुपयांची वसुली करण्यात आली.

मॉल, उपहारगृह,लॉजिंग बोर्डिंग होर्डिंग सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून २००० रुपयांची वसुली करण्यात आली.

वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत ०६ प्रकरणांची नोंद करून ९००० रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास १६ प्रकरणांची नोंद करून रु ३२०० दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास ११ प्रकरणांची नोंद करून रु ११००० दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रिश्वत मामले में CBI का एक्शन, PESO के 2 अधिकारियों सहित 4 गिरफ्तार 

Fri Jan 5 , 2024
नागपुर :- केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने रिश्वतखोरी के एक कथित मामले में पेट्रोलियम एवं विस्फोटक सुरक्षा संगठन (PESO) के दो अधिकारियों सहित चार लोगों को गिरफ्तार किया और उनके कब्जे से कुल 2.25 करोड़ रुपये की नकदी बरामद की। यहां सीबीआई के भ्रष्टाचार निरोधक ब्यूरो द्वारा दर्ज प्राथमिकी के अनुसार, गिरफ्तार किए गए लोगों में नागपुर के रहने वाले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com