सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या १२६ प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवार (४) रोजी उपद्रव शोध पथकाने १२६ प्रकरणांची नोंद करून ५२००० रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या ०१ प्रकरणांची नोंद करून रु 200 रुपयांचा दंड वसुल केला.

सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी/ उघडयावर मलमुत्र विर्सजन करणे (रु. ५००/- दंड) या अंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून ५०० रुपयांची वसुली करण्यात आली. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत ३० प्रकरणांची नोंद करून १२००० रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. १००/- दंड) या अंतर्गत १३ प्रकरणांची नोंद करून १३०० रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. ४००/- दंड) या अंतर्गत ०९ प्रकरणांची नोंद करून रु ३६०० दंड वसूल करण्यात आलेला आहे.

मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डिंग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. २०००/- दंड) या अंतर्गत २ प्रकरणांची नोंद करून रु ४००० दंड वसूल करण्यात आलेला आहे. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद या अंतर्गत ४ प्रकरणांची नोंद करून रु ६००० दंड वसूल करण्यात आला. तसेच वर्कशॉप, गॅरेजस व इतर दुरुस्तीचे व्यवसायिकांने रस्ता, फूटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणाऱ्या ०१ प्रकरणांची नोंद करून रु. १००० दंड वसूल करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त इतर ५२ व्यक्तिविरुध्द प्रकरणांची नोंद करून १०४०० रुपयेचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव करणा-या संस्थांकडून १३ प्रकरणांमध्ये १३०० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.

मनपा आयुक्त आणि प्रशासक  राधाकृष्णन बी यांचा मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांचा नेतृत्वात उपद्रव शोध पथकाचे लक्ष्मीनगर झोनचे प्रमुख संजय खंडारे, धरमपेठ झोनचे धर्मराज कटरे , हनुमान नगर झोनचे पवन डोंगरे, धंतोली झोनचे नरहरी वीरकडे, नेहरूनगर झोनचे नत्थू खांडेकर, गांधीबाग झोनचे सुशील तुपते, सतरंजीपूरा झोनचे प्रेमदास तारवटकर, लकडगंज झोनचे सुधीर सुडके, आशीनगर झोनचे संजय सोनोने आणि मंगळवारी झोनचे नरेंद्र तुरकर यांनी आपल्या जवान सोबत कारवाई केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Wide applications of AI discussed

Thu Jan 5 , 2023
NAGPUR : The cutting edge applications of Artificial Intelligence (AI) and Machine Learning (ML) in areas as diverse as vehicular communication, wireless networks, sustainable information and computer systems and sustainable development were discussed by distinguished speakers during a plenary session on “Intelligence And Sustainability In Future Information And Computer Systems,” during the 108th Indian Science Congress today. The session was […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com