तरोडी( बु)ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीत भाजप प्रणित उमेदवाराची बंडखोरी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी तालुक्यातील 27 ग्रा. प. उपसरपंच निवडणुकीच्या अखेरच्या तिसऱ्या टप्प्यातील 9 ग्रा प उपसरपंच पदाची निवडणूक आज संबंधित ग्रा प चे नवनिर्वाचित सरपंचच्या अध्यक्षतेखाली पार पडली .निवडणूक झालेल्या तरोडी बु ग्रा प उपसरपंच पदाच्या निवडणुकीत भाजप ग्रा चे माजी तालुकाध्यक्ष रमेश चिकटे यांचे बंधू व भाजप प्रणित उमेदवार सुनील चिकटे यांनी पक्षप्राणित उमेदवाराच्या विरोधात उमेदवारी दाखल करून बंडखोरीचा पवित्रा दिला.मात्र फक्त 3 मते मिळाल्याने पराभूत स्वीकारावे लागले तर विजयश्री रुपेश डेरे हे 5 मते घेऊन विजयी झाले तसेच ग्रामपंचायत केम, जाखेगाव,भुगाव,आडका, , शिवणी मध्ये उपसरपंच पदाची बिनविरोध निवडणूक पार पडली.

तर आज 10 जानेवारीला पार पडलेल्या ग्रा प उपसरपंच पदाच्या निवडणुकीत केम ग्रा प उपसरपंच पदाच्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी सरपंच अतुल बाळबुधे यांच्या अध्यक्षतेखाली व निवडणूक अधिकारी प्रदीप गायगोले यांच्या मुख्य उपस्थितीत उपसरपंच पदाचे उउमेदवार नरेश महल्ले अविरोध निवडुन आले.तसेच जाखेगाव ग्रा प मध्ये उपसरपंचपदी सुभाष क्षीरसागर बिनविरोध निवडून आले.भुगाव ग्रा प मध्ये फुलचंद आंबिलडूके अविरोध निवडून आले.आडका ग्रा प उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंच विजय खोडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत उपसरपंच पदी रत्नाकर देऊळकर अविरोध निवडून आले.शिवणी ग्रा प उपसरपंच पदाच्या निवडणुकीत मंदाबाई डोंगरे निवडून आल्या.

तर दिघोरी ग्रा प उपसरपंच पदी अश्विनी देशपांडे,परसाड ग्रा प उपसरपंच पदी सुरेश डोंगरे,वडोदा ग्रा प उपसरपंच पदी दत्तू हलमारे निवडून आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आजनी येथे नवनिर्वाचित ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण

Tue Jan 10 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यातील आजनी ( रडके ) येथे नुकतेच १८ डिसेंबर २०२२ रोजी संपन्न झालेल्या ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सरपंच , उपसरपंच आणि इतर सदस्यांचा पदग्रहण सोहळा सोमवार दिनांक ९ जानेवारी २०२३ रोजी ग्राम पंचायत कार्यालयात निवडणूक अधिकारी लोखंडे  आणि ग्रामसेवक आतिश देशभ्रतार यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी माजी सरपंच सुनील मेश्राम, उपसरपंच दिनेश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com