समाज कल्याण आयुक्तालयातर्फे संविधान उद्देशिकेचे वाचन

नागपूर : – संविधान दिनानिमित्त सहायक समाज कल्याण आयुक्त कार्यालयातर्फे आज सामूहिक संविधान उद्देशिका वाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दीक्षाभूमी स्थित विधी महाविद्यालयातील सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन उपस्थितांसमवेत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॅा. सिद्धार्थ गायकवाड यांनी केले.

जि.प. अध्यक्षा मुक्ता कोक्कडडे, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर, बार्टीचे प्रकल्प अधिकारी रितेश गोंडाने, प्रकल्प संचालक विवेक इलमे, संविधान अभ्यासक प्रा. संजय पेंडसे, पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांच्यासह विविध वसतिगृहातील विद्यार्थी तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

स्वाधार’ योजनेसाठी ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित

स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन पोर्टलचे उदघाटन जि.प. अध्यक्षा मुक्ता कोक्कडडे यांच्या हस्ते करण्यात आले. आजवर स्वाधार योजनेसाठी प्रत्यक्ष अर्जाद्वारे नोंदणी करता यायची. मात्र, आता ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे. राज्यातील स्वाधार योजनेची ऑनलाईन नोंदणी करण्याचा हा राज्यातील पहिलाच अभिनव उपक्रम आहे. या पोर्टलवर विद्यार्थ्यांना आपली ऑनलाईन नावनोंदणी सहजसुलभरित्या करता येणार आहे. जिल्हाधिकारी डॅा. विपिन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांच्या नेतृत्वात हे अनोखे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या वेबपोर्टलचा पत्ता www.mahabany.in असा आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राजकीय दबावात न येता नागपूर मेट्रो पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा अन्यथा मनसे वेगळा मार्ग स्विकारेल - मनसे चा व्यवस्थापकीय संचालकांना निर्वाणीची इशारा

Mon Nov 28 , 2022
नागपूर :- सर्व परवानग्या व तयारी पूर्ण असताना राजकीय दबावात येवून आजपर्यंत सुरू न झालेल्या मेट्रोसाठी नागपूर शहर मनसे ने महामेट्रो चे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षित यांना शहर अध्यक्ष चंदू लाडे व विशाल बडगे व शहर सचिव महेश जोशी यांच्या स्वाक्षरीने निवेदनाद्वारे निर्वाणीचा इशारा दिला. चर्चे दरम्यान नागपूर शहरातील काही मेट्रो स्थानके सोडली तर संपूर्ण मेट्रोचे जाळे पूर्ण झाले असून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com