संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 25 :- भारतीय राजयघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यानी 26 नोव्हेंबर ला भारतीय राज्य घटना भारत देशाला अर्पण केली व भारतोयानी 26 नोव्हेनबर 1949 ला संविधान अंगीकृत आणि अधिनियमित केले यावर्षी 26 नोव्हेबर ला भारतीय संविधानाला 73 वर्षे पूर्ण होत आहेत या अविस्मरणीय दिनाची आठवन म्हणून कामठी तालुक्यात ठिकठिकाणी विविध सामाजिक राजकीय संघटनेच्या वतीने संविधान प्रस्ताविकेचे वाचन तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानुसार भारतीय संविधान गौरव समिति कामठी च्या वतीने जयस्तंभ चौक स्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे भारतोय संविधान दिनानिमित्त सकाळी 9 .30 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृति पुतळयला अभिवादन करुन संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करणार आहेत तसेच सायंकाळी 5 वाजता परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .यानुसार भारताच्या संविधानिक समता ,स्वतंत्र ,बंधुता व न्याय या सिद्धांतावरच ‘लोकतंत्रनिष्ठ भारत’निर्माण होऊ शकते या विषयावर भारतीय जनसंचार संस्थान दिल्ली चे वेद प्रकाश व ब्रह्मपुरी चे प्रा संजय मगर या प्रमुख वक्त्याचे प्रबोधन होणार आहेत.या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी न्यायाधीश टेकचंद राहुल , तर अध्यक्षस्थनी भारतीय संविधान दिन गौरव समिति कामठी चे अध्यक्ष माजी नगरसेवक विकास रंगारी राहणार आहेत तर प्रास्ताविक महासचिव व माजी ग्रा प सदस्य अनिल पाटील करणार आहेत. तेव्हा या कार्यक्रमाला अधिकाधिक संख्येत नागरिकांनी उपस्थिति दर्शववि असे आव्हान भारतीय संविधान दिन गौरव समिति कामठी चे अध्यक्ष विकास रंगारी, महासचिव अनिल पाटील ,कोषाध्यक्ष सुधाताई रंगारी,सचिव सुभाष सोमकुवर,सदस्य सुगत रामटेके,राजेश ढोके, दिपंकर गणवीर,विद्याताई भीमटे,अर्चनाताई सोमकुवर,उदास बन्सोड,संजय मेश्राम,अनिल बनकर,प्रशांत नगरकर,अजय भालेकर,विरसेन गेडाम,भीमराव राऊत, नरेश वाघमारे,ऍड सचिन चांदोरकर तसेच सल्लागार समिती च्या समस्त सस्यांनी केले आहे. कार्याकारीनी सदस्यानी केले आहे.