विद्यार्थ्यांमधे वाचन संस्कृती वाढायला हवी – अति.जिल्हाधिकारी धनाजी पाटील

वाचन प्ररेणा दिनानिमित्त शिवाजी हायस्कूलमधे प्रतिपादन

गडचिरोली :- विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक कालखंडात शालेय वाचनाबरोबर आवांतर वाचनातून ज्ञान प्राप्ती करायला हवी. वाचनातून आपण एक चांगले व्यक्तिमत्व तयार उभे करू शकतो. त्यामुळेच विद्यार्थ्यांमधे वाचन संस्कृती व वाचन प्ररेणा वाढायला हवी असे प्रतिपादन अतिरीक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी केले. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या अनुषंगाने १५ ऑक्टोंबर या दिवशी त्यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन केले जाते. जिल्हा परिषद, नेहरू युवा केंद्र व शिवाजी हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. वाचन प्ररेणा वाढण्यासाठी आपण इतरांना पुस्तके भेट देवून प्ररेणा द्यावी, यातून वाचनाची आवड व त्याचे महत्व सहज पटवून देवू शकू असे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमावेळी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला माल्यापर्णन करून आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी माध्यमिक आर.पी.निकम, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी अमित पुंडे, शिवाजी हायस्कूलचे प्राचार्य रामटेके, विस्तार अधिकारी गेडाम, प्रा. सहारे, प्रा.अनिल धामोडे उपस्थित होते.    यावेळी शिक्षणाधिकारी माध्यमिक आर.पी.निकम यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना महान व्यक्तिंच्या प्रेरणेतून वाचनाचे महत्व पटवून दिले. अब्दुल कलाम यांच्या विविध लिखित पुस्तकांची माहिती दिली. ते म्हणाले विद्यार्थ्यांमधे ग्रंथालय आवड निर्माण झाली पाहिजे. पुस्तकांशी मैत्री करून आपण आपल्या कुटुंबाला चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो. आयुष्यात यशस्वी मार्ग शोधण्यासाठी वाचनाची गरज आपल्याला आहे. यानंतर जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे असल्याचे प्रतिपादन केले. आयुष्यात एक चांगला अधिकारी, चांगला व्यक्ति होण्यासाठी आवांतर वाचनातून ज्ञान आत्मसात करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. समाजात चांगला व्यक्ति म्हणून वावरण्यासाठी, आपली ओळख निर्माण करण्यासाठी वाचनातून घेतलेल्या ज्ञानशक्तीची गरज असते असे ते पुढे म्हणाले. यावेळी नेहरून युवा केंद्राचे अमित पुंडे यांनी वाचन प्ररेणा बाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, समाजात वाचन संस्कृती रूजविण्यासाठी शालेय स्तरावर प्रयत्न करण्याची गरज आहे. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रमाणे जिद्द न सोडता कष्टातून आपली स्वप्न पुर्ण करावीत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य रामटेके यांनी केले. तर आभार प्रा.सहारे यांनी मानले. सुत्रसंचलन हिवरकर यांनी केले.वाचन संस्कृती वाढीसाठी जिल्ह्यात नवी संकल्पना राबविणार : आर पी निकम 

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी प्रत्येकाच्या वाढदिवसाच्या दिवशी ग्रंथालयाला भेट देऊन पुस्तके देण्याची नवी संकल्पना शिक्षणाधिकारी आर पी निकम यांनी मांडली. याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की आपल्या वाढदिवसाच्या दिवशी प्रत्येकाने कमीत कमी एक पुस्तक तरी जवळच्या ग्रंथालयाला भेट म्हणून द्यायचे. यातून ग्रंथालयातील पुस्तकांची संख्याही वाढेल व इतर मुलांना यातून वाचनासाठी मदत मिळेल. आता जिल्ह्यात सर्वच शाळांमध्ये या पद्धतीने आम्ही नवीन संकल्पना राबवण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले.

जागतिक हात धुवा दिनाचे आयोजन : शिवाजी हायस्कूल येथे वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १५ ऑक्टोंबर हा जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा करण्यात येते. या पार्श्वभूमिवर हायस्कूलच्या प्रांगणात हात धुवा प्रात्यक्षिक रून या दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. यावेळी युवा अधिकारी अमित पुंडे यांनी हात धुताना करावयाच्या सात स्टेप्स मुलांना सांगितल्या व शिक्षणाधिकारी निकम यांनी स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बालविवाह मुक्त भारत जनजागृती अभियान

Sun Oct 16 , 2022
नागपूर :- 16 ऑक्टोबर रोजी, सायंकाळी ५ वाजता  कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन दिल्ली यांच्या अंतर्गत नागपूर शहरात दोन एनजीओ बालविवाह मुक्त भारत अभियान राबवित आहे.महिमा बहुद्देशीय सामाजिक संस्था आणि आस्था बहुउद्देशीय संस्था यांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन गांधी पुतळा सीताबर्डी ते संविधान चौक चौकापर्यंत पदयात्रेचे आयोजन या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती राहतील. आणि आस्था बहुउद्देशीय संस्थे च्यावतीने इंदोरा चौक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com