आता या क्षणी साऱ्यांनीच मला खांद्यावर बसवून माझी गावभर मिरवणूक तुम्ही काढायला हवी माझे कौतुकाने पटापट मुके घ्यायला हवेत, कौतुकाने मला कडेवर बसवून माझ्या आवडीची खेळणी मला विकत घेऊन द्यायला हवीत कारण जे थेट जळगाव जिल्ह्याला ठाऊक नव्हते ज्याची उभ्या महाराष्ट्राला देखील पुसटशी कल्पना नव्हती ती माहिती मी तुम्हाला याच ठिकाणी खूप आधी सांगून मोकळा झालो होतो कि एकनाथ खडसे कसे व कोणाच्या माध्यमातून भाजपामध्ये येताहेत किंबहुना त्यांना प्रवेश द्यायला हरकत नाही असा ग्रीन सिग्नल कोणी विशेषतः त्या अमित शाह यांच्याकडून मिळविलेला आहे. कोण भाजपामधला कळीचा नेमका नारद सांगून टाकले होते. विशेषतः चाणाक्ष शरद पवार यांनाही थेट अंधारात ठेवून उल्लू बनवून विजेचा धक्का बसावा पद्धतीने ज्या दिवशी स्नुषा रक्षा खडसे विरोधात लोकसभा न लढविण्याची स्पष्ट व जाहीर कल्पना राष्ट्रवादीची ताकद एकनाथ खडसे यांनी थेट शरद पवारांना प्रत्यक्ष भेटून दिली त्यानंतर आपल्याकडे आता तुल्यबळ उमेदवार नाही हे जेव्हा जळगाव जिल्ह्यातल्या शरद पवार राष्ट्रवादी नेत्यांच्या लक्षात आले त्यानंतर लगेच सतिश पाटील संजय पवार इत्यादी स्थानिक नेत्यांनी विशेषतः एकनाथ खडसे विरोधात फोडलेला टाहो खरोखरी हृदयाला छेदून गेला किंवा आधी ज्या पद्धतीने शरदराव बहुतेकांना दगा फटका करत सत्तेच्या राजकारणात पुढे गेले, आज थेट त्यांच्यावर नियतीने उगवलेला सूड, इतरांनी त्यापासून बोध घ्यावा, मी तुम्हाला अगदी बेंबीच्या देठापासून ओरडून सांगेल…
कल्याण लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार विकासपुरुष डॉ श्रीकांत एकनाथ शिंदे तुम्ही निवडणूक व निकाल आटोपल्यानंतर मनाचा उदारपणा दाखवीत आपणहुन स्वतःच्या खिशातून विशेषतः निवडणुकीत निवडणूक प्रचारादरम्यान तुमच्या प्रतिस्पर्धी उमेदवार वैशाली दरेकर यांचा स्वतःच्या पर्समधून जो खर्च होईल तो तुम्ही आपणहून त्यांना विचारून घेत त्यांच्या घरपोच इतरांच्या कानी न घालता उगाच गवगवा न करता पोहोचता करायलाच हवा, सुरुवातीला अनेक वर्षे सामना सुरु होण्यापूर्वीच आपला पराभव ठरलेला आहे नक्की आहे माहित असूनही बांगलादेश ज्या हिमतीने केवळ अनुभव घेण्यासाठी मैदानात उतरायचा कुठलीही यात अतिशयोक्ती नाही पण जी वस्तुस्थिती आहे त्यानुसार पदरमोड करीत कदाचित केवळ आणखी एक बांगला देश पद्धतीने अनुभव म्हणून याही लोकसभेला वैशाली दरेकर थेट डॉ श्रीकान्त शिंदे यांना आव्हान देत लोकसभा लढवताहेत, श्रीकान्त यांचे ते मोठेपण उदारवृत्ती प्रत्यक्ष कृतीतून दिसायलाच हवी त्यांनी आपल्या या काहीशा कमकुवत महिला उमेदवाराचा एक भगिनी या नात्याने मान राखायला हवा त्यांच्या निवडणुकीचा खर्च श्रीकांत यांनी त्यांना घरपोच पाठवायलाच हवा कारण उद्धव ठाकरे यांचे तर कायमच खिसे उपडे असतात आणि पैसे खर्च करण्याच्या बाबतीत चेहरा हागवणीचा मोठा त्रास असल्यागत कायम उदास व भकास असतो जणू त्यांना स्वतःला पैशांअभावी अनेकदा उपवास घडतो. याउलट है क्या तेरे पास खर्चा पानी के लिये कुछ, अशीही विचारणा उद्धवजींकडून वैशाली यांना केल्या गेली तर अजिबात आश्चर्य वाटून घेऊ नये, डॉ श्रीकांत आणि एकनाथजी तुम्ही दोघांनीही या एकतर्फी निकालाच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवाराला उगाच आर्थिकदृष्ट्या कंगाल करून एका महिलेला वाऱ्यावर सोडू नये. नाइन्साफी होगी….
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते उघड गुपित सांगतो कि याच एकनाथ यांची कायम उभ्या महाराष्ट्राला सापत्न वागणूक असते म्हणजे एकटा ठाणे जिल्हा एकीकडे आणि उर्वरित महाराष्ट्र दुसरीकडे अशी काहीशी सावत्र आईची भूमिका ते निभावतात, सुरुवातीपासूनच हे महाशय इतरांच्या तुलनेत ठाणे जिल्ह्यावर लाडक्या मुलासारखे प्रेम करतात हे तुम्हालाही सांगणे म्हणजे साधी काडेपेटी जरी विकत घ्यायची असेल तर मातोश्रीवर दुसऱ्याच्या खिश्याकडे आशाळभूत नजरेने बघितल्या जाते हे त्या मिलिंद नार्वेकर यांना सांगण्यासारखे. डॉ श्रीकांत देखील आपल्या पिताश्रींची डिट्टो कॉपी, दोघांसाठी ठाणे जिल्हा म्हणजे पट्टशिष्या आणि कल्याण लोकसभा मतदार संघ म्हणजे पट्टराणी, दोघांचेही तेच म्हणजे काळजी राज्याची करतील पण जातीने सतत लक्ष त्या ठाणे जिल्ह्यात व कल्याण लोकसभा मतदार संघात घालतील, पुढल्या दहा वर्षात किंवा दहा वर्षानंतर जी विकास कामे अख्ख्या लोकसभा मतदार संघातून आटोपल्या जातील असे अपेक्षित असतांना, या पितापुत्राने अगदी विरोधकांचे दावे देखील फोल ठरवीत विशेष म्हणजे हा आपला तो विरोधक असा कुठलाही संकुचित विचार न करता अगदी थेट मुंब्र्याचा देखील सर्वांगीण विकास साधण्यात सतत पुढे धावणारे हे दोघेही, म्हणून उद्याचा निकाल आजच तेथे लागल्याने वैशाली दरेकर यांच्या उगाच होणाऱ्या पायपिटीची विशेषतः होणारी आर्थिक झीज, त्याची काळजी एक त्रयस्थ असून देखील मला वाटते, डॉ श्रीकांत यांनी त्यांचा निवडणुकीत होणारा खर्च स्वतः उचलण्याचा नक्की मोठेपणा दाखवावा. तुम्ही आम्ही रस्त्याने कायम बघतो कि त्या शिर्डीला जमाव करून अनेक भक्त पायपीट करीत बाबांच्या दर्शनाला जातात, रस्त्याने आपण बघतो कि बहुतेक उत्साही भक्त पालखी सभोवताली गर्दी करून पुढे पुढे जातात पण एखादा कृश वयस्क अशक्त भक्त एकटाच मागे पडतो आणि भिर भिर नजरेने इकडे तिकडे बघत कसाबसा पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करतो पण काही केल्या त्याला यश मिळत नाही नेमके ते तसेच 2009 लोकसभा निवडणुकीत जे घडले, त्याहीपेक्षा कितीतरी पटीने अधिक विदारक आज त्या वैशाली दरेकर बाबत बघायला मिळते आहे म्हणजे त्या घोळक्याला सोडून एकट्याच घनदाट जंगलात भटकताहेत, त्यांच्याकडे बघून वाटते, डॉ श्रीकांत त्या विरोधक असल्या तरी महिला आहेत त्यांच्याही पाठीशी तुम्ही उभे राहायलाच हवे…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी