संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत वेकोलि इंदर कोळसा खदान नं.६ येथे स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर ग्रामिण पथकाने पेट्रोलिंग दरम्यान अग्नी शस्त्र बाळगणारा आरोपी रवि काशीराम गोंड उर्फ धुर्वे यास पकडुन त्याचे जवळुन देशी बनावटीचे अग्निशस्त्र जप्त करून पुढील कारवाई करीता पोलीस स्टेशन कन्हान च्या स्वाधिन करण्यात आले.
सोमवार (दि.१८) मार्च २०२४ ला पो.स्टे.कन्हान हद्दीत स्थागुअ शाखा पथक नागपुर ग्रामिण हयाना पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीव्दारे वेकोलि इंदर कोळसा खदान नंबर ०६ येथे अवैध अग्नी शस्त्र बाळगणाऱ्या इसम रवी काशीराम गोंड उर्फ धुर्वे, ३० वर्ष, रा. इंदर कॉलरी खदान नं. ०६ कन्हान यास पंच व स्टाफसह पकडुन त्याचे जवळुन देशी बनावटी चे लोखंडी हॅन्ड लेट अग्निशस्त्र किमत ४०००० रूप याचा मुद्देमाल जप्त करून कागदपत्रासह पुढील कायदेशीर प्रक्रिये करीता पोलीस स्टेशन कन्हान यांचे ताब्यात देवुन आरोपी रवि काशीराम गोंड उर्फ धुर्वे विरूद्ध कलम ३/२५ भा ह का, १८८ भादंवि १३५ मपोका अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर कार्यवाही स्थागुअ शाखा नागपुर ग्रामिण पथक पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यां च्या मार्गदर्शनात पोउपनी बट्टूलाल पांडे, सफौ नाना राऊत, पो.हवा. विनोद काळे, इक्बाल शेख, प्रमोद भोयर, पोना संजय बरोदिया, चा पोहवा मुकेश शुक्ला आदीनी यशस्विरित्या पार पाडली.