नागपूर :- राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम-2013 अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील पात्र लाभार्थ्यांसाठी 31 डिसेंबर 2024 पर्यंत अनुज्ञेय असलेले अन्नधान्य मोफत वितरित करण्यात येत आहे. शिधापत्रिका धारकांनी महिन्याच्या 1 तारखेपासून धान्याचा लाभ घ्यावा.
माहे मार्च महिन्याचे शिधावस्तु वाटपाचे परिमाण या प्रमाणे आहेत. प्राधान्य गट प्रति व्यक्ती 1 किलो गहु व 4 किलो तांदुळ तर अंत्योदय गटास प्रति शिधापत्रिका 10 किलो गहु व 25 किलो तांदुळ मोफत देण्यात येणार आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी 20 रुपये प्रति किलो दराप्रमाणे एक किलो साखर देण्यात येणार असल्याचे अन्नधान्य वितरण अधिकारी नागपूर यांनी कळविले आहे.