राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळाला राज्यपालांचे अभिवादन

गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे समाधीस्थळ व प्रार्थना मंदिराला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट

अमरावती  :राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मोझरी येथील राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे शांतीस्थान महासमाधीला आज भेट दिली. यावेळी महासमाधीवर त्यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच येथील प्रार्थना मंदिरालाही भेट दिली.

समाधीस्थळावरील शांतता व पावित्र्य मनाला संमोहित करणारे आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांनी ही भूमी पावन झालेली आहे. राष्ट्रसंतांच्या विचारांची ज्योत प्रत्येकाने आपल्या मनात तेवत ठेवावी. हीच खरी त्यांना मानवंदना ठरेल, असे श्री कोश्यारी यावेळी म्हणाले.

    महापौर चेतन गावंडे, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सचिव जनार्दन बोधे, श्रीमती निवेदिता चौधरी, अध्यात्म विभाग प्रमुख डॉ राजाराम बोधे तसेच जिल्हाधिकारी पवनीत कौर, उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे, तहसिलदार वैभव फरताडे, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ आदी यावेळी उपस्थित होते.

    अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळामार्फत राज्यपाल श्री कोश्यारी यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विरचित गद्य-पद्य ग्रंथ संपदा, ग्रामगीता तसेच शाल, श्रीफळ देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

दुबई वर्ल्ड एक्स्पोमध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे सादरीकरण - सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची अबुधाबी फिल्म कमिशनला भेट

Thu Nov 25 , 2021
मुंबई  : दुबई येथे सध्या वर्ल्ड एक्स्पोचे आयोजन करण्यात आले असून त्यात महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव वेगवेगळ्या पद्धतीने सादर करण्यात आले आहे. या दरम्यान राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी अबुधाबीचे फिल्म कमिशनर हन्स फारकीन यांची भेट घेऊन उभय देशादरम्यान चित्रपट निर्मितीत लागणाऱ्या तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान करण्यासंदर्भात, तसेच या क्षेत्रात महाराष्ट्रात गूंतवणूक करण्याबाबत चर्चा केली. दुबई सांस्कृतिक कार्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com