निरीक्षनांनतर कंपनीला मिळाली अ. श्रेणी .
रामटेक :- महाराष्ट्र विकास सहकार महामंडळ पुणेचे अधिकारी यांनी एन.बी फारमर प्रोडुस कंपनी रामटेक यांनी कोणती कामे केली कोणत्या पद्धतीने कामे केली याचे निरीक्षण व सविस्तर माहिती घेण्या करिता महाराष्ट्र विकास सहकार महामंडळ पुणेचे अधिकारी मॅनेजिंग डायरेक्टर एम.सी. डी.सी मिलिंद आकरे, विदर्भ चीफ एम.सी.डी.सी जगदाळे, एरिया मॅनेजर एम.सी. डी.सी बेदारकर साहेब ,पुणे.एम.सी. डी.सी चास्कर , व ठाकुर (गोंदिया) यांनी एन.बी. फार्मर प्रोड्युसर कंपनी रामटेकला भेट दिली. एन.बी फार्मर प्रोड्युस कंपनी ही शेतकऱ्यांचा हितात सामोरे असतात. गवतापासून जैवंन्याची निर्मिती या कंपनी मार्फत होत आहे जवळ जवळ 10 हजार हून अधिक शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन करून ,त्यांना मार्गदर्शन करत आहे. त्यांचा कडून उत्पन्न झालेल्या जैवंन्य आपल्या देशाचा कामात येईल. व देशासह शेतकऱ्यांचा देखील नक्कीच फायदा होईल. असे महाराष्ट्र विकास सहकार पुणे चे , मॅनेजिंग डायरेक्टर एम. सी. डी.सी मिलिंद आकरे यांनी सांगितले.
एन.बी फार्मर प्रोडुस कंपनी रामटेक चे ऐकून साडेसहाशे सभासद झाले आहे. या सर्व सदस्यांना आम्ही रासायनिक पुरवठा केला आहे. नामदार सुनील केदार यांचाशी चर्चा केली आहे की, जेवढ्याही फॉर्मर प्रोडुस कंपनी आहे त्यांचा सभासदाला गायी आणि बकरी देण्यात यावी. असे जिल्हा परिषद सदस्य तथा एन.बी फॉर्मर प्रोडुस कंपनी रामटेक चे डायरेक्टर दुधराम सव्वालाखे यांनी सांगितले.
एन.बी. फॉर्मर प्रोडूसर कंपनी ही अधिकाऱ्यांच्या निरीक्षनानंतर अ श्रेणी गटात आलेली आहे.
आणि सरकार या कंपनीला नक्कीच मदत करेल अशे आश्वासन देखील अधिकाऱ्यांनी सांगितले. उत्कृषट काम बघून सर्व अधिकाऱ्यांना समाधान वाटले. त्यांनी म्हंटले की शेतकऱ्यांना बळकट करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करू.
अशी माहिती डॉ रामसिंग सहारे यांनी दिली.
यावेळी सर्व अधिकारी , कंपनीचे डायरेक्टर तथा जिल्हा परिषद सदस्य दुधराम सव्वालाखे ,शेतकरी नेते मिताराम सव्वालाखे , नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चे माजी संचालक डॉ रामसिंग सहारे,
, व शेतकरी सभासद उपस्थित होते.