रामटेक :-कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य यांचे वतीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रामटेक येथे आज दि.३० मे ला छत्रपती शाहु महाराज युवाशक्ती करिअर शिबीर थाटात पार पडले. यावेळी विशेषतः विविध महाविद्यालयातील प्राचार्य आवर्जुन उपस्थित होते.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था रामटेक येथे दि. ३० मे ला सकाळी १०.३० वाजता दरम्यान करीयर शिबीराचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले किट्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश श्रिखंडे यांचे हस्ते पार पडले. यानंतर उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ तथा मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला. शिबीर दोन सत्रात पार पडले. दरम्यान शासकीय आय.टी.आय. इंदोरा येथील प्राचार्य केतन सोनपिपरे, शासकीय आय.टी.आय. कामठी येथील प्राचार्य अनिल जिभकाटे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था रामटेक चे प्राचार्य देवेंद्र कवाडकर तथा किट्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रामटेक चे प्रिंसीपल डॉ. अविनाश श्रीखंडे यांनी विद्यार्थ्यांना करीअरबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. संचालन संदीप कुमार कोटांगळे यांनी तर प्रास्ताविक प्राचार्य कावडकर यांनी केले. मनोज धारपुरे यांनी आभार प्रदर्शन करून शिबीराची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था रामटेक येथील निदेशक मनोजकुमार धारपुरे, रेवाराम साठवणे, संदीप कोटांगळे, आर.एस. खोब्रागडे, प्रफुल बावणे, संजय मदनकर, डी.एन. भगत, नारायण मानेकर, पवन पाटील, प्रशांत बावनकर, देशभ्रतार, मिरगे, शेंडे, स्वाती खोब्रागडे, स्वरूप, कुणाल पाटील यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.