– दिनेश दमाहे ,मुख्य संपादक
रामटेक – दिनांक 19/01/2022 रोजी पोलीस ठाणे रामटेक येथे दाखल असलेला अप. क्र. 47/22 कलम 302,201 भादवि गुन्ह्याचे समांतर तपासा दरम्यान आपले मार्गदर्शनात सदर गुन्ह्यातील अनोळखी प्रेत हे संदीप प्रसन्न कुमार मिश्रा, वय 56 वर्ष, रा.खोब्रागडे नगर नागपूर ह.मु.पटगवरी येथील फार्म हाऊस यांचे असल्याचे माहिती प्राप्त झाली. सद्या राहत असलेल्या सदर ठिकाणी जाऊन त्यांना कोणी व कशासाठी मारले याबाबत तपास करून दिनांक 20/01/2022 मिळालेल्या गोपनीय माहिती वरून संशयीत आरोपी नामे महेश भैय्यालाल नागपुरे, वय 41 वर्ष, रा.सिंधिटोला, ता.सालेकसा, जि. गोंदिया यास ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे इतर साथीदार एक महिला व दोन मुले यांचे मदतीने केल्याचे सांगितले. तसेच मृतक संदीप मिश्रा यांचे सोबत राहणारी महिला नामे जयवंता टिकाराम भगत, वय 45 वर्ष, रा.पटगोवरी येथील फार्महाऊस ही सुद्धा बेपत्ता असल्याने त्याबाबत आरोपी महेश नागपुरे यांचेकडे विचारपूस केली असता त्याने तिचा सुद्धा खून करून मृतदेह भंडारा जिल्ह्यातील हायवे रोडलंगत फेकल्याचे सांगितले. यावरून माहिती घेतली असता पो.स्टे. करडी जि. भंडारा येथे मर्ग क्र.02/2022 कलम 174 सी आर पी सी नुसार अकस्मात मृत्यूची नोंद असल्याचे समजले.अशा प्रकारे यातील आरोपी व विधीसंघर्ष बालकांनी मिळून दोघांचाही खून केला.
हत्येचे कारण- यातील आरोपी पुरुष व महिला यांच्यात असलेल्या अनैतिक संबंधाची माहिती यातील दोन्ही मृतकानी आरोपी महिलेच्या पतीस सांगीतल्याच्या कारणावरून खून केला.
ताब्यात घेण्यात आलेले आरोपी व विधिसंघर्ष बालके-
1) महेश भैय्यालाल नागपुरे, वय 41 वर्ष, रा.सिंधिटोला,ता. सालेकसा, जि. गोंदिया
2) सौ. रिता धनराज, बागबांधे, वय 32 वर्ष, रा.मरकाखांदा, ता.सलेकसा, जि. गोंदिया
3) दोन विधिसंघर्ष बालके
ताब्यात घेण्यात आलेले महिला व पुरुष आरोपिंची वैद्यकीय तपासणी करून विधिसंघर्षग्रस्त बालकांसह पुढील योग्य ते कायदेशीर कारवाई करीता पोलीस स्टेशन रामटेक यांचे ताब्यात देण्यात आले असून पूढील तपास पोलीस स्टेशन रामटेक करीत आहे.
सदर दुहेरी हत्याकांडातील गुन्ह्याचा उलगडा व आरोपी पकडण्याची कार्यवाहीतील पथक- पो.नि.ओमप्रकाश कोकाटे, सपोनि राजीव कर्मलवार, सपोनि जितेंद्र वैरागडे, पोउपनी जावेद शेख, गजेंद्र चौधरी, नाना राऊत, विनोद काळे, पोना विपीन गायधने, शैलेश यादव, रोहन डाखोरे, प्रणय बनाफर, विरेंद्र नरड, सतीश राठोड, सुमेध तायडे, संगीता वाघमारे,(सायबर सेल), चालक साहेबराव बहाले, अमोल कुथे यांनी पार पाडली.