रमाई नगर अद्याप तहानलेलेच, पाण्यासाठी एस डी ओ सचिन गोसावी यांना निवेदन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- येथील रमाई नगरातील जवळपास 50 ते 60 घरांमधे पाईपलाईन असून सुद्धा नगर परिषद द्वारा पाणी पुरवठा केला जात नाही, पाण्या अभावी आजही रमाई नगरातील रहिवासी तहानलेलेच आहेत.

येथील नागरिकांच्या मागणी चे निवेदन भाजप पदाधिकारी उज्वल रायबोले, शंकर चवरे,ऋषी दहाट यांनी आज दुपारी उपविभागीय अधिकारी सचिन गोसावी यांना सोपविले. यावेळी माजी नगरसेवक लालसिंग यादव, प्रतिक पडोळे उपस्थित होते.

रमाई नगरात तातडीने पाणी पुरवठा करण्याबाबत उपविभागिय अधिकारी सचिन गोसावी यांच्या सोबत चर्चा करण्यात आली त्यांनी याबाबत नगर परिषद मुख्याधिकारी बोरकर यांना आवश्यक निर्देश देण्यात येतील असे स्पष्ट केले.

निवेदना वर रमाई नगरातील रहिवासी रतन रंगारी, सूरज बोरकर, शैलेश ऊके, कुंदन ऊपरीकर, मुकेश गोंडाने,राहुल भगत, मनोज वासनिक, शारदा भगत, गिरिजा जाधव, प्रकाश टेंभरे यांच्या स्वाक्षरी आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Priority should be given for bringing about awareness regarding digital copyright related crime and cyber security

Fri Mar 22 , 2024
– Piracy websites pose highest threat for dissemination of Malware – Brijesh Singh – Cyber security report of ISB Institute of data sciences published Mumbai :- “The piracy websites are a big thread for spreading of malwares. The consumers are not only watching a pirated movie or a TV show but these devices may contain your identity, the banking details […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights