अरोली :- येथून जवळच असणाऱ्या ग्रामपंचायत राजोली अंतर्गत येणाऱ्या राजोली टोली (रामनगर) येथील राम मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. धार्मिक कार्यक्रम भजन, कीर्तन, गोपाल काला व शेवटी समारोप महाप्रसादाने करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजोली टोली येथे राममंदिर बांधकाम करून देणारे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कोटापल्ली, माजी सरपंच परम धमय्या मैनेनी, श्यामलाल भुजाडे, सचिन भगत ,प्रवीण भगत, योगेश महादुले ,आर्यन गोल्हार, वासुदेव कर्लपुडी, पुरुषोत्तम शेंद्रे ,केवलराम भगत, कांतीलाल भगत, छबिलाल परिहार, सचिन मस्के, सदानंद हरडे, संजय जांभुळकर सह समस्त महिला, बालगोपाल भक्तगणांनी सहकार्य करून परिश्रम घेतले.