राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार विद्यार्थ्यांचे प्रस्ताव तत्काळ पाठवा

 

नागपूर दि. 21 : मागीलवर्षातील  फेब्रुवारी व मार्च 2021 मध्ये दहावी व बारावी परीक्षेत प्रथम आलेल्या अनुसूचित जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांची निवड राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारासाठी   करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयाचे  प्राचार्य व शाळांचे मुख्याध्यापकांनी पात्र विद्यार्थ्यांचे प्रस्ताव तात्काळ सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे. परीक्षेचा निकाल लागल्यानंतर  या विद्यार्थ्यांची राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारासाठी  निवड करुन  प्रस्ताव त्वरित सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

            सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून विभागीय बोर्ड, तालुका, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील प्रथम आलेल्या अनुसूचित जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार देण्यात येतो. सदर पुरस्कार मिळण्यासाठी आवश्यक त्या कागद पत्रांसह प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नागपूर यांच्याकडे सादर करावे.

           अधिक माहितीसाठी  कार्यालय सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन शासकीय आय.टी.आय समोर श्रध्दानंदपेठ, नागपूर येथे संपर्क करावा.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

डॉगा रुग्णालयाचा अभिनव उपक्रम सिकलसेल कार्यशाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन

Tue Dec 21 , 2021
नागपूर दि.21 : 11 ते 17 डिसेंबर दरम्यान जिल्ह्यात सिकल सेल सप्ताहाचे आयोजन डागा स्त्री व बाळ रुग्णालयात करण्यात आले होते. सप्ताहादरम्यान सिकलसेल आजाराबाबत मार्गदर्शन व जनजागृती करण्याकरीता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पोस्टर मेकिंग व रांगोळी स्पर्धा, तपासणी व जनजागृती शिबीर, ऑनलाईन वेबिनार व कार्यशाळा आदीचे कार्यक्रमाचे उदघाटन डॉगा हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. सिमा पारवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!