संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- सेठ केसरीमल पोरवाल कनिष्ठ महाविद्यालय, कामठी येथे राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती मोठया आनंदाने साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक प्रा डॉ सुधीर अग्रवाल होते. प्रमूख अतिथी म्हणुन प्रा.कमल गंधेवार तर प्रमुख वक्त्या म्हणून प्रा किरण काळे/पुडके उपस्थित होत्या.प्रमुख अतिथी म्हणून बोलताना प्रा. किरण काळे/ पुडके यांनी जिजाऊ या स्वराज्याचे तिन कोण जोडणारी सामान रेषा आहेत असे प्रतिपादन केले तसेच स्वराज्याचे संकल्पक शहाजी राजे, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्याचे रक्षक छत्रपती संभाजी महाराज या तिघांसाठी जिजाऊ प्रेरणादायी ठरतात,असे प्रतिपादन प्रा किरण पुडके/काळे यांनी केले व विवेकानंदांनी तसेच जिजाऊनी संस्कार कशाप्रकारे दिले व या संस्काराची शिदोरी आपण कशा प्रकारे समोर घेऊन गेलो पाहिजे हे उदारणासहीत स्पष्ट केले.प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्रा गंधेवार यांनी विवेकानंदांवर बालवयातच धार्मिक संस्कार कसे झाले हे स्पष्ट केले.
तसेच विवेकानंदाचे विचार युवा पिढी पर्यंत पोचवले. प्रमुख अध्यक्ष म्हणून बोलताना प्रा. डॉ सुधीर अग्रवाल यांनी राष्ट्रमाता जिजाऊ व विवेकानंद यांच्या विचारातील साम्य स्पष्ट करत त्यांचे राष्ट्रीय विचार मांडले. या प्रसंगी प्रा.ममता गुल्हाने यांनी देखील विवेकानंद यांचे विचार आजच्या युवकांनी आत्मसात करण्यास सांगितले.या प्रसंगी दिक्षिता टेकाम, गौशिया परवीन, प्रज्वल सोलंकी,नवनीत तिवारी या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन आकांक्षा बरिये व आभार प्रदर्शन खुशी तांडेकर यांनी केले. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या प्रसंगी पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाच्या अर्थशास्त्राच्या प्रा डॉ किरण पेठे यांना आचार्य पदवी प्राप्त झाल्याच्या निमित्ताने पुष्गुच्छ देवुन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजक प्रा ज्ञानेश्वर रेवतकर यांनी हा कार्यक्रम घडवून आणण्यात मोलाचे सहकार्य केले.