संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- दुर्गादेवी नगर येथील जिजाऊ लायब्रेरी संस्था वाचनालय कामठी येथे राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती मोठया आनंदाने साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेले कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष काशिनाथ प्रधान यांनी जिजाऊ या स्वराज्याचे तिन कोण जोडणारी सामान रेषा आहेत असे प्रतिपादन केले तसेच स्वराज्याचे संकल्पक शहाजी राजे, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्याचे रक्षक छत्रपती संभाजी महाराज या तिघांसाठी जिजाऊ प्रेरणादायी ठरतात, व विवेकानंदांनी तसेच जिजाऊनी संस्कार कशाप्रकारे दिले व या संस्काराची शिदोरी आपण कशा प्रकारे समोर घेऊन गेलो पाहिजे हे उदारणासहीत स्पष्ट केले.तसेच स्वामी विवेकानंदांवर बालवयातच धार्मिक संस्कार कसे झाले हे स्पष्ट केले.व विवेकानंदाचे विचार युवा पिढी पर्यंत पोहोचवले व विवेकानंद यांचे विचार आजच्या युवकांनी आत्मसात करण्यास सांगितले.
याप्रसंगी वाचनालयातील विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.