‘जनसामान्यांच्या हक्काचा बुलंद आवाज देवेंद्र फडणवीस’ यांच्या कार्य अहवालाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन

– नागपूरसह दक्षिण-पश्चिम मतदार संघाच्या विकासाला चालना

– आयकॉनिक संस्था,मेडिकल हब,मेट्रो सिटी म्हणून नवी ओळख

नागपूर :- देवेंद्र फडणवीस हे कर्तबगार व धडाडीचे लोकप्रतीनिधी आहेत. त्यांनी राज्याच्या विकासासाठी तसेच नागपुरच्या सर्वांगिण विकासासाठी बहुमोल योगदान दिले आहे. महत्वाचे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत तसेच जनतेला जागतिक दर्जाच्या उत्तम सेवा मिळाव्यात यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात असे प्रतिपादन केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघातील विकास कामांवर आधारित कार्यअहवाल पुस्तिकेचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.

यावेळी आमदार प्रवीण दटके, डॉ. परिणय फुके, महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, आदीवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, तसेच माजी सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे, प्रकाश भोयर, माजी महापौर नंदा जिचकार, किशोर वानखेडे, प्रा.राजू हडप, रितेश गावंडे आदी उपस्थित होते.

दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्राचे आमदार, राज्याचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता तसेच उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची जनतेप्रती असेलेली कटिबध्दता यामुळेच नागपूर शहरासह राज्यातील जनतेमध्ये एक आश्वासक नाते निर्माण केले आहे. त्यामुळेच त्यांना लोकांचा भरपूर पाठिंबा मिळत आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना काळात केलेले कार्य कधीही महाराष्ट्र विसरणार नाही. त्यांनी या काळात मदत कार्यावर जातीने लक्ष ठेवले. स्वत:वर संकट ओढवले तरी त्यांची पर्वा न करता पालकांचे क्षेत्र हरवलेल्यांना दत्तक घेतले, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. पण याचा कुठेही गाजावाजा केला नाही.

उपराजधानीला नवी दिशा देण्याचे काम अव्याहतपणे सुरु आहे. मेट्रो, मिहान, आयआयएम सारख्या आयकॉनिक संस्था यासोबतच विकासासाठी त्यांनी केलेले प्रयत्न सर्वश्रृत आहे. समृध्दी महामार्गात अनेक राजकीय अडथळे आले ते दूर करण्याची किमया त्यांनी साधली. त्याचमुळे नागपूर थेट मुंबईशी जोडले गेले. आणि राज्याला समृध्द करण्याचा मार्ग सुकर झाला. दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघ, नागपुरचा विकास गडचिरोली सारख्या अतिदूर्गम आदीवासी जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी पालक म्हणून जबाबदारी स्वीकारली. रोजगाराच्या प्रश्नासोबत शेतकरी देखील समृध्द व्हावा तसेच समाजातील सर्वच घटकांना विकासाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा आढावा या कार्यअहवाल पुस्तिकेत सादर करण्यात आला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नरसी मोनजी संस्थेमुळे नागपुरात केजी टू-पीजी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे मोठे दालन - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Thu Oct 10 , 2024
Ø उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज कॅम्पसचे भूमिपूजन Ø नागपुरातील विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के जागा राखीव आणि शैक्षणिक शुल्कामध्ये 20 टक्के सूटhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 नागपूर :- शहरातील आयकॉनिक संस्थांच्या यादीत नरसी मोनजी शैक्षणिक संस्थेमुळे भर पडणार असून केजी टू पीजी पर्यंतचे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे दालन उभारले जाणार आहे. नागपूर आणि विदर्भातील विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे, प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com