संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- शिवाजी नगर येथील रहिवासी राजेश सोमकुवर यांने पायाच्या पंजाच्या जख्मेच्या त्रासाला कंटाळुन स्वत: घरी दोरीने गळफास लावुन आत्महत्या केली.
शनिवार (दि.२९) जुलै ला दुपारी १ वाजता फिर्यादी मेघराज खेमचंद लुंडुरे वय ४९ वर्ष रा. शिवाजी नगर प्रभाग नं.७ कन्हान याच्या घरासमोर लोकांची गर्दी दिसुन आली. तेव्हा घराचे बाहेर येउन पाहिले असता शेजारी राहणारा राजेश एकनाथ सोमकुवर स्वत: चे राहत्या घरी समोरील छपरीत दोरीने गळफास लावुन लटकलेले मृत अवस्थेत दिसुन आल्याने त्वरित पोलीस स्टेशन कन्हान ला माहीती दिली. पोलीसांनी पोहचुन मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कार्यवाही करिता कामठी उपजिल्हा रूग्णालयात घेउन गेले. राजेश सोमकुवर याला मागील २० – २२ वर्षा पासुन उजव्या पायाच्या पंजाच्या वरिल भागाला मार लागला होता. त्यानी औषधोपचार करुन त्या माराची जख्म बसत नसल्याने त्याला पायाचा भयंकर त्रास असल्याने त्या त्रासाला कंटाळुन त्याने स्वत: आज (दि.२९) जुलै ला सकाळी ८ ते १२ वाजे दरम्यान गळफास लावुन आत्महत्या केली असावी. राजेश हा दारु पिण्याच्या सवयीचा असुन कोणतेही काम धंदा करित नव्हता. त्याचे मृत्यु बाबत कोणावरही शक, संशय नाही. अश्या फिर्यादी मेघराज खेमचंद लुंडुरे यांचे तक्रारीने कन्हान पोलीसानी पोलीस निरिक्षक प्रमोद मकेश्वर यांचा मार्गदर्शनात मर्ग दाखल करून पुढील तपास करित आहे.