राजे फॉउंडेशन कन्हान व्दारे शाळेतील विद्यार्थ्यां ना बुट व मोजे वाटप केले

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- १५ ऑगस्ट स्वातंत्र दिनी शाळेतील विद्या र्थ्यानी बूट मोजे घालुन शिस्तीत स्वातंत्र दिन उत्साहा त साजरा करता यावा.या सार्थ हेतुने राज फॉऊंडेशन कन्हान व्दारे पंडित जवाहारलाल नेहरू विद्यालयातील गरजु शंभर विद्यार्थ्याना बूट व मोजे वाटप करण्यात आले.

स्वातंत्र्य दिन उत्साहाने थाटात साजरा करित असताना समाजातील काही संस्था अश्या पण आहेत ज्या आपला आनंद दुसऱ्यां सोबत साजरा करतात.

अशीच कन्हान ची राजे फॉउंडेशन संस्था ही दर वर्षी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन शाळेतील विद्यार्थ्याना बुट व मोजे वाटप करित असतात. याच अनुसंगाने यावर्षी सुध्दा बुधवार (दि.१४) ऑगस्ट ला राजे फॉउंडेशन व्दारे पंडित जवाहरलाल नेहरू विद्या लय कन्हान येथिल शाळेच्या गरजु १०० विद्यार्थ्याना बूट (जुते़) व मोजे राजे फॉउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष केतन भिवगडे, निलेश गाडवे यांच्या हस्ते वाटप कर ण्यात आले.

याप्रसंगी नितीन बुराडे, अभिजित चांदुर कर, संतोष तुप्पट, संगिता मेंढे, महिमा शेंडे, रोशन सोनटक्के, रितेश जनबंधु, अमर मोहबे, शुभम चहांदे, शुभम येवले, रोहित गजभिये आदीनी प्रामुख्याने उपस्तिथ उपस्थित राहुन विद्यार्थ्याना बुट व मोजे वाटप करण्यास सहकार्य केले. कार्यक्रमास शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी बहु संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

इचलकरंजी शहरातील प्रलंबित योजनांची कामे तातडीने मार्गी लावून पाणी पुरवठा योजनेचे काम प्राधान्याने करा - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Thu Aug 15 , 2024
मुंबई :- इचलकरंजी शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या लोकसंख्येमुळे शहराच्या पायाभूत सुविधांवर ताण पडत आहे. इचलकरंजीकरांना दिलासा देण्यासाठी शहरासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या योजना तातडीने मार्गी लावाव्यात. तसेच इचलकरंजीकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शहराची पाणीपुरवठा योजना प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. इचलकरंजी (जि. कोल्हापूर) शहराच्या विविध प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com