यवतमाळ :- सन २०२४-२५ मध्ये अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती योजनेतंर्गत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी शासनाने मंजुरी दिलेली आहे. ईच्छूक विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
योजनेबाबतच्या मंजुरी आदेशानुसार महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विस्तृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतीम मुदत दि.12 जुलै ही आहे. परदेश शिष्यवृत्तीच्या अधिक माहितीसाठी क्युआर कोड देण्यात आला असून कोड स्कॅन केल्यानंतर सविस्तर माहिती उमेदवारास उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील ईच्छूक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याणच्या सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.