रेल्वेच्या मालगोदामाला आग

– फलाट क्रमांक आठ जवळील सायंकाळची घटना
– कर्मचारी, कामगारात प्रचंड खळबळ
नागपूर –  मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 8 वरील पार्सलच्या मालगोदामाला सायंकाळी आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन जवान घटनास्थळी रवाना झाले. पाण्याचा मारा करून तासाभराच्या आत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. विशेष म्हणजे रेल्वे प्रशासनाच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली.
नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक आठच्या मागे म्हणजे संत्रामार्केटच्या दिशेने पार्सल कार्यालय आहे. या कार्यालयात मालाची आवक जावक असते. तसेच माल चढविणारे आणि उतरविणारे कामगार नेहमीच असतात. याच धावपळीत सायंकाळच्या सुमारास मालगोदामाला अचानक आग लागली. किरकोळ आग असली तरी वाढत्या तापमानात आग वाढायला वेळ लागला नसता. परंतु, रेल्वे प्रशासन आणि उपस्थित कामगारांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सादीक नावाच्या एका व्यक्तीने अग्निशमन कार्यालयाला सूचना दिली. क्षणाचाही विलंब न करता पाण्याचा एक बंब घटनास्थळी रवाना झाला. पाण्याचा मारा करून आगीवर पूर्णत नियंत्रण मिळविले. दरम्यान मालगोदामातील पोती आणि एक जुनी अ‍ॅक्टीव्हा जळाली. जवळपास 10 हजारांचे नुकसान झाले. रेल्वेची शंभर टक्के बचत झाली, अशी माहिती अग्निशमन कार्यालयाने दिली.
सिगारेटमुळे कचर्‍यातून आग पसरल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, ही आग नेमकी कशी लागली याबाबत खुलासा होऊ शकला नाही. नागपूर मध्यवर्ती स्थानकावर दरदिवशी हजाराच्या संख्येने प्रवासी ये-जा करतात. आग जर इतर ठिकाणी पोहोचली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. लवकर आटोक्यात आल्याने प्रवासी व प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २७ वा दीक्षांत समारोह संपन्न

Wed May 18 , 2022
दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानगंगा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नाशिक – मुक्त व दूरस्थ शिक्षण हे आधुनिक युगातील ज्ञानग्रहणाचे पसंतीचे माध्यम झाले आहे. आज अनेक खासगी विद्यापीठे व शिक्षण संस्था देखील दूरस्थ शिक्षणाचा उपयोग करीत आहेत. दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून मुक्त विद्यापीठाने शिक्षणाची ज्ञानगंगा जास्तीत जास्त गरीब व गरजू लोकांपर्यंत पोहोचवावी असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com