आडका गावातील तालावसदृश्य पाण्यात 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यु..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 25:-कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या महालगाव,दिघोरी ,आडका गावात मागील अडीच वर्षापासून रेल्वे प्रशासनाच्या वतीने नागपूर नागभीड रेल्वे ब्रॉडगेज चे रेल्वे लाईन व उडानपुल बांधकामाचे कामे प्रगतीपथावर असून संबंधित रेल्वे प्रशासनाच्या कंत्राट दाराने कुठलेही पूर्वसूचना न देता तसेच कुठलेही संदेश फलक न लावता खोल असलेले खड्डे खोदून ठेवले होते. या खड्ड्यात साचलेल्या पाण्याने नाला व तलाव सदृश स्वरूप निर्माण झाले आहे.या कामाचे कंत्राटदार च्या वतीने असलेल्या अक्षम्य दुर्लक्षितपणामुळे व मनमानी कारभारामुळे मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत मात्र भावनाशून्य व श्रीमंतीच्या गर्तेत वाहणाऱ्या या कंत्राट दाराला प्रशासनाचा कुठलाही भय नसल्याने मृत्यू प्रकरणातही कुठल्याही संवेदना दिसून येत नाही.मागील दिवसातील घडामोडीवर प्रकाश टाकला असता भांडेवाडी येथे एक मृत्यू प्रकरणं घडले होते तसेच दीड वर्षांपूर्वी दिघोरी गावातील 12 वर्षीय संजय राजहंस चौधरी चा या डबक्यात पडून मृत्यू झाला होता तर आज सकाळी आडका गावातील तालावसदृश्य स्वरूप प्राप्त खोल पाण्यात गावातील 75 वर्षीय वृद्ध विश्वनाथ शेंडे चा बुडून मृत्यू झाला.या घटनेने गावकऱ्यांचा राग अनावर झाला व घटनास्थळी तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती दरम्यान कांग्रेस नेत्या प्रा अवंतिकाताई लेकुरवाडे व माजी जी प अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर यांच्या नेतृत्वात भर उन्हात तीन तास 300 नागरिकांच्या समवेत आंदोलन स्वरूपातून संबंधित कंत्राटदाराला वेठीस धरण्यात आले.तसेच या मनमानी कारभाराला बळी पडलेले मृतक विश्वनाथ शेंडे यांना नुकसान भरपाई देत नाही तेव्हा पर्यंत प्रेत उचलणार नाही तसेच या तलाव सदृश्य स्वरूप पाण्याच्या खोल खड्ड्याच्या बाजूला असलेल्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याची मागणी केली.रेटून धरलेल्या या मागणीला गांभीर्याने लक्षात घेत गावातील शेतकरी पुरुषोत्तम खोडके यांची दोन एकर शेती तलावसदृश पाण्यामध्ये परिवर्तित झाल्याने कंत्राटदाराने सदर शेती विकत घेण्याचे मान्य करीत शेतकऱ्याला दहा लक्ष रुपयांचा धनादेश दिला तसेच मृतक विश्वनाथ शेंडे च्या कुटुंबाला चार लक्ष रुपयांचा धनादेश दिल्याने तनावपूर्ण आंदोलन स्थिती नियंत्रणात आली.

प्राप्त माहितीनुसार नागपूर नागभीड नेरोग्रेज ब्रॉडग्रेज अंतर्गत आडका गावात सुरू असलेल्या कामात कंत्राटदार पी व्यंकट रमैय्या अवैधरित्या मुरूम उत्खनन करून दहा एकर पेक्षा जास्त जमिनीवर तलावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.यासंदर्भात प्रा अवंतिका लेकुरवाडे यांनी संबंधित कंत्राटदारांची तक्रार जिल्हाधिकारी तसेच तहसिलदारकडे केली होती या तक्रारीची दखल घेत तहसीलदार अक्षय पोयाम यांनी या कंत्राट दारावर 62 कोटी 77 लक्ष रुपयांचा दंड ठोठावला होता. तहसीलदार अक्षय पोयाम यांनी केलेली ही कारवाही सर्वात मोठी कारवाही असल्याचे बोलले जात होते.

मात्र या तलावसदृश्य बाजूचे शेतकरी पुरुषोत्तम खोडके यांची दोन एकर शेती तलावामध्ये परिवर्तित झाली होती यासंदर्भात कंत्राटदाराने नुकसान भरपाई मिळवून द्यावे यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले मात्र हाती काही लागेना आणि कंत्राट दाराचं चांगभलं सुरू होतं मात्र काळाने झळप घेतली व याच ठिकाणी आज सकाळी विश्वनाथ शेंडे नामक 75 वर्षोय इसमाचा मृतदेह आढळल्याची बातमी कळताच कांग्रेस नेत्या प्रा अवंतिका लेकुरवाडे,माजी जी प अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर,सभापती दिशाताई चनकापुरे, माजी सभापती आशिष मललेवार,केम ग्रा प चे सरपंच अतुल बाळबुधे आदींनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनाचा पवित्रा घेतला.व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय प्रेत ला हात लावू देणार नाही अशी मागणी करीत तीनशे लोकांच्या उपस्थितीत भर उन्हात रस्त्यावर आंदोलन केले अखेर या आंदोलनाला यश आले व कंत्राट दाराकडून या पाण्यात परिवर्तित झालेली शेतकऱ्यांची दोन एकर शेती विकत घेण्याचे मान्य करत दहा लक्ष रुपयांचे धनादेश दिला व मृतकाच्या कुटुंबियांना चार लक्ष रुपयांचा धनादेश दिला. यावर आंदोलनकारीने समाधान प्राप्त केले.आणि प्रशासनाला सूचना देण्यात आल्या की जिथे अशे पाणी साचलेली स्थिती आहे ती जागा जलयुक्त शिवारात परिवर्तित करावे .तणावपूर्ण स्थिती नियंत्रणात आली असली तरी झालेल्या मृत्यूच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होते.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com