संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नवी कामठी भागाला जोड़णाऱ्या रेल्वे अंडर पास ब्रिज मधे बाराही महीने नगर परिषदच्या मोठ्या नाल्याचे पाणी जमा राहते त्या मुळे नागरिकांना,विद्यार्थीना मोठा त्रास होतो. याबाबत भाजपा पदाधिकाऱ्या तर्फे मंगळवार 20 ऑगस्टला धरणे आंदोलन करण्यात आले होते.
त्याची दखल घेऊन आज सकाळी दक्षिण पुर्व मध्य रेल्वे चे वरिष्ठ अधिकारी राधाकृष्णन सर यांच्या मार्गदर्शनात रेल्वे अधिकारी राजेंद्र गोंडाने व नगर परिषद कामठीचे अधिकारी अशोक वाजपेयी,विकास धामती, अवि चौधरी,विरेंद्र ढोके, आणि भाजपा पदाधिकारी लालसिंग यादव,संजय कनोजिया, प्रतिक पडोळे,उज्वल रायबोले यांनी जॉइंट सर्वे केला व समस्यावर चर्चा केली.
यावेळी रोहित दहाट, उदय इंगोले, नवीन कोडापे, शैलेश रामटेके,गेंदलाल कलसे,शानु ग्रावकर,निलेश सकतेल,मोहम्मद इक़बाल, वकील अहमद, अनिल बोरकर, हर्ष डांगे, आकाश बोंबले, अनिकेत चाटे, निशांत यादव यांच्या सह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
लवकरच या समस्येवर कायम स्वरूपी तोडगा निघण्याची शक्यता आहे.