संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– 13 आरोपीस अटक,1 लक्ष 26 हजार 610 रुपयांचा मुद्देमाल जप्त,डीसीपी पाच पथकाची कारवाही
कामठी :- कामठी शहरातील दुर्गा चौकात मागील काही दिवसांपासून आॅनलाईन लॉटरी सेंटरच्या नावाखाली तरुण बेरोजगार लोकांना आमिष दाखवून जुगार खेळ चालविला जात असून आॅनलाईन लॉटरी सेंटरवर आॅनलाईन लॉटरी ही चार अंकी न खेळता फक्त दोन अंकामध्ये खेळवित असल्याची गुप्त माहिती मिळताच डीसीपी पाच च्या पथकानी काल रात्री सदर ऑनलाईन लॉटरी सेंटरवर यशस्वीरीत्या धाड घालून 13 आरोपीना ताब्यात घेत त्यांच्यावर कायदेशीर रित्या गुन्हा दाखल करून नगदी 7हजार 710 रुपये व इतर साहित्य असा एकूण 1 लक्ष 26 हजार 610 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर दुर्गा चौकातील ऑनलाईन लॉटरी सेंटर मध्ये अवैधरीत्या एल ई डी टीव्ही वर श्री, लव,वशिकरण ,सुदर्शन ,वास्तू आकडेवर पैस्याची बाजी लावून हारजित चा जुगार खेळ खेळताना आढळून आले.
वास्तविकता सुरू असलेला लॉटरी प्रकार हा आॅनलाईन लॉटरीमध्ये न मोडता सरळ सट्टापट्टी, मटका या प्रकारात जुगारात मोडत असल्याने डिसीपी पाच च्या पथकाने सदर आॅनलाईन लॉटरी दुकानावर यशस्वीरीत्या धाड घातली.
या कारवाईत आरोपी कुमार शेंडे वय 29 वर्षे ,सनी रामटेके वय 25 वर्षे ,अखिलेश लाहुड वय 24 वर्षे,रोहित पाटील वय 25 वर्षे,रवी कांबळे वय 38 वर्षे,प्रीतम काकडे वय 34 वर्षे,मोहम्मद नौशाद मोहम्मद युसूफ वय 48 वर्षे,शकील इस्माईल शेख वय 37 वर्षे,राकेश हेडावू वय 31 वर्षे,सोहेल सलीम खान वय 21 वर्षे,बॉबी याकलवार वय 26 वर्षे,मोहम्मद अलत्मस मोहम्मद अर्षद वय 20 वर्षे,तौसिफ खान वय 29 वर्षे सर्व राहणार कामठी विरुद्ध भादवी कलम 4,5 महाराष्ट्र जुगार कायदा अनव्ये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले.या कारवाईतुन नगदी 7 हजार 710 रुपये,वेगवेगळ्या कंपनीचे 7 मोबाईल किमती 70 हजार रुपये,डीवाईन कंपनीची टीव्ही 25 हजार रुपये,सिपीयू मशीन 10 हजार रुपये,मॉनिटर 10 हजार रुपये,लहान प्रिंटर स्कॅनर 25 हजार रुपये ,माउस, राऊटर असा एकूण 1 लक्ष 26 हजार 610 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही यशस्वी कारवाही डीसीपी निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनार्थ सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर,अंकुश गजभिये,रवी शाहू, अरुण चांदणे,योगेश ताथोड आदींनी केली असून पुढील तपास सुरू आहे.