नागपूर / कळमेश्वर – अवैधरित्या सुरू असलेल्या मोहफुलाच्या दारू भट्टीवर पोलिसांनी धाड टाकून जवळपास दहा लाख रुपयांच्या सडवा मोहफुल जप्त करुण नष्ट करण्यात आले . पोळा पाडवा सणाच्या अगोदरच कळमेश्वर पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांची संयुक्त प्रतिबंधक कारवाई केली . जिल्ह्यातील अवैध धंद्याच्या नायनाट करण्याच्या उद्दिष्टाने जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी पोलीस अधिकाऱ्यांना आदेश देऊन पोलीस स्टेशन स्तरावर अवैध दारू व जुगार धद्यांवर धडक कारवाई करण्याची मोहिम राविण्याचे आदेश निगर्मित केले आहे .
प्राप्त माहिती नुसार कळमेश्वर पो.स्टे हद्दीतील गोंडखैरी येथील पारधी बरड येथे मोठया प्रमाणावर अवैध गावठी दारू तयार करून आजुबाजुचे परिसरात विक्री करणार असल्याची गोपनीय खबर कळमेश्वर पोलिसांना मिळाल्याने पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, पोलीस उपविभागीय पोलिस अधिकारी अजय चांदखेडे यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण येथील पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोेकाटे तसेच पोलिस स्टेशन कळमेश्वर चे प्रभारी अधिकारी आसिफराजा शेख यांचे नेतृत्वाखाली आज दि. 22/08/2022 रोजी पहाटे 05.30 वा. सुमारास पोलिस स्टेशन कळमेश्वर हद्दीतील गोंडखैरी पारधी बरड येथे सुरू असलेल्या अवैध दारू भट्टीवर छापे मारून एकुण कि. 10,00,000/-रूपयाचा मुद्देमाल जप्त करून एकुण 08 आरोपीतांवर पोलिस स्टेशन कळमेश्वरयेथे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे. कारवाई दरम्यान एकुण 8000 लिटर कच्चे रसायन सडवा 210 लिटर तयार दारू जप्त करण्यात आली असून दारूभट्टी साठी लागणारे एकुण 45 ड्रम, घमेले व दारू तयार करणेकामी लागणारे साहीत्य जप्त करून गावठी दारूच्या भट्टया उद्धवस्त करण्यात आल्या आहेे.
सदरची कारवाई सपोनि मनोज खडसे, मेश्राम, पोउपनि मुंडे, गायकवाड, मपोउपनि गेडाम, ग्रेड पोउपनि हिवरकर, पाली, नागपूर, सफौ मन्नान नोरंगाबादे, पोहवा प्रकाश उईके, पोना गणेश मुदमाळी, निलेशउईके, श्रीकात बोरकर, रवी मेश्राम, पोशि राणासिंग ठाकुर व कळमेश्वर पोलिस स्टेशन इतर अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण येथील सपोनि राजीव कर्मलवार व इतर कर्मचारी यांचे पथकाने पार पाडली.