कळमेश्वर :- दिनांक ३०/०५/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपूर ग्रामीण हद्दीत अवैध धंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस स्टेशन कळमेश्वर हद्दीत वार्ड नं. ४ येथे काही इसम हे एका घरात IPL क्रिकेट मॅच मधील गुजरात टायटन विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांचे मध्ये खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यावर बेटिंग (सट्टा) लावुन जुगार खेळत असल्याची गोपनिय माहीती पथकास प्राप्त झाले वरून सदर पथकाने कळमेश्वर हद्दीत वार्ड नं. ०४ येथे सापळा रचुन छापा टाकून आरोपी नामे १) अमोल प्रेमराज उके, वय ३५ वर्ष, रा. वार्ड क्र. ४ कळमेश्वर जिल्हा नागपूर २) कैलास उर्फ पिंटू साहेबराव कोहिटे, वय २५ वर्ष, रा. वार्ड क्रमांक १४ कळमेश्वर जिल्हा नागपूर ३) रवी खडसे, रा. कळमेश्वर जिल्हा नागपूर हे लोकांकडुन पैसे घेवुन IPL क्रिकेट मॅच मधील गुजरात टायटन विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स यांचे मध्ये खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यावर बेटिंग (सट्टा) लावुन जुगार खेळतांनी मिळुन आले. एकुण ०३ जुगारी इसम यांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातून १) ५ मोबाईल किमती ५१,०००/- रुपये २) नगदि २०००/- रुपये ३) इतर दस्तऐवज असा एकूण ५३,२०५/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीताविरूद्ध पोलीस ठाणे कळमेश्वर येथे गुन्हा नोंदवून आरोपींतांना जप्त मुद्देमालासह पुढील कायदेशीर कार्यवाही करीता पोलीस ठाणे कळमेश्वर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदिप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली परी सहायक पोलीस अधिक्षक अनिल म्हस्के, परी पोलीस अधीक्षक राहुल झालटे, पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, सहायक फौजदार चंद्रशेखर गडेकर, पोलीस हवालदार राजेंद्र रेवतकर, दिनेश आधापुरे, पोलीस नायक किशोर वानखेडे, उमेश फुलवेल यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.