कोर्टाच्या सूचनेनुसार लवकरच निर्णय घेणार, कोर्टाच्या निकालानंतर राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया

मुंबई :- सर्वोच्च न्यायालयाने सत्ता संघर्षावरील निकाल देताना काही महत्त्वपूर्ण बाबी स्पष्ट केल्या. कोणत्या राजकीय पक्षाचा व्हीप लागू होईल. याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यायचा आहे. या निर्णयाचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वागत केले. राहुल नार्वेकर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर म्हणाले, संविधानातील कार्यकारी मंडळ, विधिमंडळ आणि न्यायमंडळ यांचे कार्यक्षेत्र वेगवेगळे आहेत. विधानसभा अध्यक्षांच्या अधिकाराला न्यायालयाने मान्यता दिली आहे. याबद्दल मी या निकालाचे स्वागत करतो. संविधानातील १० शेड्यूल नुसार राजकीय पक्षाचे व्हीप लागू व्हायला पाहिजे, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हंटलं. राजकीय पक्षातील कोणता गट योग्य यासंदर्भातील निर्णय विधानसभा अध्यक्षांना दिला आहे.

येणाऱ्या काळात सुनावणी घेऊ

येणाऱ्या काळात योग्य ती सुनावणी घेऊ. त्यावर योग्य निर्णय घेऊ. योग्य वेळेत हा निर्णय घेणार असल्याचंही राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. ते म्हणाले, राजकीय पक्ष कोणता योग्य आहे. त्यानंतर पिटीशनला नैसर्गिक न्यायाच्या तत्वाने सर्वांना त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी देऊ. सर्व नियमांचे पालन करून. घटनात्मक बाबीचा विचार करून निर्णय घेऊ. संसदीय लोकशाहीला बळकट करण्यासाठी असे निर्णय कामात येतील.

कोणावरही अन्याय होता कामा नये

राजकीय पक्ष मान्यताप्राप्त कोणता. त्यानंतर विरोधकांचं म्हणणं काय. पिटीशनवर घेऊन लवकरात लवकर निर्णय घेण्याचा प्रयत्न करू. असं राहुल नार्वेकर म्हणाले. प्रत्येकाला वेळ दिला जाणार. बराच वेळ लागणार नाही. कारण यात कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही. घाईघाईत निर्णय घेतला जाणार नाही. कोणावरही अन्याय होता कामा नये, याचा विचार केला जाईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नितीश कुमार-शरद पवार यांची भेट, देशातील विरोधी पक्ष एकत्र येणार?

Thu May 11 , 2023
नितीश कुमार-शरद पवार यांची भेट, देशातील विरोधी पक्ष एकत्र येणार? मुंबई :-  बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देशात विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी भेट देणे सुरू केले आहे. दोन दिवसांपूर्वी ते ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटवाईक यांना भेटले. देशात २०२४ च्या निवडणुकीत विरोधी पक्ष एकत्र आल्यास भाजपला निवडणुकीत टक्कर देऊ शकतात. याचसंदर्भात आज नितीश कुमार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com