कॉंग्रेसमधील अंतर्गत कलहामुळेच राहुल गांधी पंतप्रधान पदापासून दूर! – इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांचा दावा

मुंबई :- देशातील सर्वात जुना पक्ष असलेला कॉंग्रेस सध्या त्यांचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी झटत आहे.पक्षातील मातब्बर नेत्यांमध्ये सुरू असलेले गटातटाचे राजकारण याकरीत कारणीभूत आहे.पक्षातील अंतर्गत गटबाजीने राहुल गांधी यांना पंतप्रधान पदापासून दूर ठेवले आहे,असा दावा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी मंगळवारी केला.

कॉंग्रेसमधील अंतर्गत कलहामुळे महाराष्ट्रात पक्षाचे पानिपत होत आहे.शिक्षक मतदार संघात बंडखोरी करणारे कॉंग्रेस नेते सत्यजित तांबे निवडून आले आहे.अशात कॉंग्रेसची स्थिती बुडत्या जहाजासारखी झाली आहे.पक्षाचे जेष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात समन्वय नाही.अशात केवळ सत्ताप्राप्तीसाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर अवलंबून राहणे कॉंग्रेसच्या प्रतिमेला तडे देणारे आहेत.पक्षाचे केंद्रीय सुत्रे एकाहाती नसल्याने पक्षात विक्रेंद्रीकृत नेतृत्व उदयाला येत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये देखील भाजपविरोधातील लाटेमुळे कुठलेही विशेष प्रयत्न न करता कॉंग्रेस सत्तेवर आले.या राज्यात भाजपने थोडे अधिक प्रयत्न केले असते तर कदाचित हिमाचल मधील सत्ता त्यांना टिकवता आली असती.

वर्षभरात राजस्थान, कर्नाटक, मध्यप्रदेश, छत्तीसगढ सह इतर राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहे.या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला प्रभावी नेतृत्वाची गरज आहे. २०२४ मध्ये होवू घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीपुर्वीचा हा अंतिम सामना असल्याने यात चांगली कामगिरी करीत इतर राज्यांमध्येही सत्ता काबीज करण्याचा मानस कॉंग्रेसचा आहे. पंरतु, उत्कृष्ठ नेतृत्व कौशल्य, संघटन बांधणी आणि आपसातील हेवेदावे विसरल्याशिवाय कॉंग्रेसला यशाचा मार्ग गवसणार नाही, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. या राज्यात मिळणाऱ्या यशाच्या भरवश्यावरच राहुल गांधी यांची पंतप्रधान पदावरील दावेदारीचे भवितंव्य अवलंबून आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

“लोकेश चंद्रा यांची बांधिलकी बेस्टसाठी की कोणत्या पक्षासाठी?”, मनसे नेते केतन नाईक यांना मुख्यमंत्र्यांना पत्र देत सवाल

Wed Feb 8 , 2023
मुंबई :- बृह्नमुंबई महानगपालिकेच्या अखत्यारितील बेस्ट उपक्रमा अंतर्गत कामगारांचे प्रश्न वारंवार पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे मांडूनही कोणतीच कारवाई न झाल्यामुळे जनरल मॅनेजर लोकेश चंद्रा यांची चौकशी करून कारवाई केली जावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कामगार कर्मचारी सेनेचे कार्याध्यक्ष केतन नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्र पाठवत मागणी केली आहे. या पत्रात प्रामुख्याने केजुअल कामगारांना अद्याप सेवेत रुजू करून घेण्यात आले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com