नागपूर :-०२ जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस स्थापना दिवस म्हणुन साजरा केला जातो. त्या निमीत्याने नागपूर ग्रामीण हद्दीतील अनेक शाळा, कॉलेजांमध्ये नागपूर ग्रामिण पोलीस दलातर्फे रेझिंग डे’ सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत असुन या दरम्यान नागपूर ग्रामीण येथील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस रेलिंग डे दिनानिमित्य विविध शाळांमध्ये कार्यक्रम राबविले.
यामध्ये पो.स्टे, सावनेर अंतर्गत राम गणेश गडकरी महाविद्यालय सावनेर येथे दिनांक ०५/०१/२०२४ रोजी ११.०० वा. ते १२.०० वाजता दरम्यान रवींद्र मानकर पोलीस निरीक्षक यांनी विद्यार्थी विद्यार्थिनींना पोलीस रेझिंग दिनानिमित्य सायबर विषयी जनजागृती करण्याकरिता मार्गदर्शन केले तसेच आठवडी बाजार भिवापुर येथे पोलीस रेझिंग डे निमित्त्याने आठवडी बाजारात खरेदी करण्याकरीता येणान्या नागरीकांना वाहन चोरी व मोवाईल बोरीच्या वाढत्या घटनासंबंधी माहिती देवुन बाजारात वाहने पार्कोंग करतेवेळी घ्यावयाची काळजी तसेच मोवाईल चोरीच्या घटनांवर कसा प्रतिबंध करता येईल याबाबत मार्गदर्शन केले.
पोलिस ठाणे काटोल अंतर्गत रेझोंग डे सप्ताह निमित्त बनारसी दास रुईया हायस्कूल काटोल येथे सहायक पोलीस निरीक्षक शितल खोब्रागडे यांनी विद्यार्थ्यांना महिला अत्याचार, वाल लैंगिक अत्याचार व सायबर क्राईम तसेच वाहतूक नियमाबाबत व इतर विषयावर मार्गदर्शन केले. पो.स्टे. कळमेश्वर येथे नगरपरिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळमेश्वर येथील विद्यार्थी / विद्यार्थीनिंना पोलीस प्रशासन कसे काम करतो याबाबत माहिती देवून पोलीस वाहतूक अंमलदार यांनी वाहतुकीचे नियम याबाबत माहिती देऊन अपघात वेळी काय काळजी घेतली पाहिजे तसेच इतर तात्काळ मदतीसाठी डायल ११२ वर कॉल करून कशी मदत मिळते त्याबाबत माहिती देण्यात आली.