नागपूर :- लॉयन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234H1 लायन्स क्लब अमेझ चे रिजन चेअरपर्सन लॉ नितीन लोणकर मार्फत हायलँड ग्लोरी सेलिब्रेशन अंबाझरी नागपूर येथे 23 मार्च 2025 ला मोठ्या थाटात रिजन कॉन्फरन्स चे आयोजन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लॉ डॉ रीपल राणे, प्रमुख वक्ते डॉ लोकेंद्र सिंग, न्यूरो सर्जन, माजी जिल्हा राज्यपाल बलबीर सिंग वीज, अतिथी विनोद वर्मा, श्रवण कुमार, भरत भलगट व्हाइस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर-1, विलास साखरे, व्हाइस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर-2 उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्याच्या हस्ते द्वीप प्रज्वलन आणि लायन्स प्रार्थना करून करण्यात आली यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले.
प्रमुख वक्ते म्हणून डॉ लोकेंद्र सिंग, न्यूरो सर्जन, सिम्स हॉस्पिटल बजाज नगर यांना पाचारण करण्यात आले सदन ला संबोधित करतांना 30 ते 45 वयोगटातील तरुण पिढीतील लोकांमध्ये अती कामाचा व्याप वाढल्यामुळे आणि जास्त वेळ काम केल्याने मेंदूतील रक्तस्त्राव स्पोंडिलिसिस, हृदयविकार अशा प्रकारच्या अनेक बिमारीला समोर जावे लागत आहे म्हणून अती काम करून पैशाच्या मागे न लागता कुटुंबाला वेळ द्या आणि समाधानी जीवन जगायला शिका असा मोलाचा सल्ला यावेळी देण्यात आला.
कॉन्फरन्स मध्ये अनेक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये बॅनर परेड, प्रेसिडेंट स्पीच, सेक्रेटरी स्पीच, स्क्रैप बुक, सेक्रेटरी फाईल, कोषाध्यक्ष फाईल अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये रिजन 10 अंतर्गत येणाऱ्या 13 क्लब ने आपला सहभाग दर्शविला.
प्रामुख्याने लायन्स क्लब ऑफ नागपूर हेरीटेज ने कॉन्फरन्स मध्ये आपला सक्रिय सहभाग दर्शविला. स्पर्धेमध्ये हेरीटेज क्लब ला 13 पारितोषिक प्राप्त झालेत त्यामध्ये 3 प्लॅटिनम, 6 गोल्ड, 4 वैयक्तिक अवॉर्ड चा समावेश आहे. त्यामध्ये बॅनर परेड, प्रेसिडेंट स्पीच, सेक्रेटरी स्पीच, स्क्रैप बुक, जास्तीत जास्त उपस्थिती, बेस्ट क्लब, फोटो डिस्प्ले, आर सी व्हिजिट, जनसंपर्क/इमेज बिल्डिंग, अॅडमिनिस्ट्रेशन अवॉर्ड समीर पंडित, बेस्ट लायन ऑफ ईयर- विवेक वैद्य, स्क्रॅप बुक-मृदुला हेडाऊ, एमजे एफ अवॉर्ड – विजया वाईदेशकर यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे संचालन हेमंत आडगावकर यांनी फार सुंदर रित्या सादर केले तर आभार प्रदर्शन गुणवंत बालपांडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यामागे लायन्स क्लब अमेझ च्या अध्यक्षा मोनाली लोणकर आणि त्यांच्या टीमचा मोलाचा वाटा आहे. कार्यक्रमाला सर्व क्लब चे अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष झोन चेअरपर्सन आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.