रा.तु.म. नागपूर विद्यापीठ कराटे संघात हर्षिल हिची निवड

नागपूर :-नुकत्याच झालेल्या नागपूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन कराटे स्पर्धेमधील काता या स्पर्धा प्रकारामध्ये इंदिरा गांधी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, हनुमान नगर, नागपूर या महाविद्यालयातील बी.पी.एड.-द्वितीय वर्षाची विद्यार्थीनी हर्षिल हिने सुवर्णपदक प्राप्त करून नागपूर विद्यापीठाच्या संघात आपले नाव पक्के केले. पुढील महिन्यात छत्तीसगढ येथे सुरू होणार्‍या अखिल भारतीय कराटे स्पर्धेमध्ये हर्षिल भाग घेणार आहे.

महाविद्यालयात आयोजित सत्कार समारंभात संस्थेचे संस्थापक अरूण जोशी यांनी पुष्पगुच्छ व ट्रॅक शुट देऊन हर्षिल हिचा सत्कार केला व तिला पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयदीप घोष, डॉ. बाबुलाल धोत्रे, डॉ. दत्तात्रय करांगळे, डॉ. रमेश बन्सोड, डॉ. गणेश कटकदेवरे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तोतलाडोह बांध क्षेत्र में मछुआरों के खिलाफ वन विभाग की बड़ी कारवाई

Sun Dec 25 , 2022
– 120 जालियों सहित कुछ नावों को पकड़ा – मछुआरे अपना जाल और नाव छोड़ भागे – घटना 23 दिसंबर की शाम की – मछली पकड़ने के खिलाफ वन विभाग ‘एक्शन मोड’ में रामटेक :-  कल प्रसिद्ध पेंच टाइगर रिजर्व के तोतलाडोह बांध झील क्षेत्र में पेंच टाइगर रिजर्व के विशेष सुरक्षा बल की टीम ने 23 दिसंबर की शाम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com