कामठी रेल्वे स्थानकावर पुरी जोधपुर सुपरफास्ट एक्सप्रेस व रिवा नेताजी सुभाषचंद्र बोस एक्सप्रेसला मिळाला थांबा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी रेल्वे स्थानकावर काल 21 डिसेंबर पासून जोधपुर पुरी सुपरफास्ट एक्सप्रेस व रिवा इतवारी एक्सप्रेस थांब्याला सुरुवात झाली आहे . कामठी येथे सैनिक प्रशिक्षण केंद्र असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून सैनिक प्रशिक्षणासाठी मोठ्या संख्येने येत असतात, कामठी येथील हजारो नागरिक प्रत्येक दिन रेल्वेने नागपूर येथे कामानिमित्त जाणे येणे करीत असतात कामठी रेल्वे स्थानकावर अनेक महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या थांबत नव्हत्या त्याकरिता कामठी येथील नागरिकांनी अनेकदा खासदार कृपाल तुमाने यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली होती निवेदनाची दखल घेत खासदार कृपाल तुमाने यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना प्रत्यक्ष भेटून कामठीस्थानकावर अनेक महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मिळावा यासाठी मागणी केली होती त्याची दखल घेत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल पासून पुरी जोधपुर पुरी सुपरफास्ट एक्सप्रेस व रिवा नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी एक्सप्रेस थांबायला सुरुवात झाली. काल सकाळी दहा वाजता सुमारास कामठी रेल्वे स्थानकावर आमदार टेकचंद सावरकर यांचे हस्ते दोन्हीही एक्सप्रेस रेल्वे गाड्यांच्या चालकांचे स्वागत करून मिठाईचे वाटप केले व हिरवा ध्वज दाखवून पुढील प्रवासासाठी दोन्ही सुपर फास्ट रेल्वे गाड्यांना रवाना केले. यावेळी अप्पर रेल्वे व्यवस्थापक श्रीकांत चंद्रकापुरे, वरिष्ठ व्यवस्थापक दिलीप सिंह, सहाय्यक व्यवस्थापक अरविंदकुमार,रेल्वे सल्लागार समिती चे बबलू तिवारी व समस्त सदस्य ,माजी जी।प।सदस्य अनिल निधान, कामठी भाजपा शहर अध्यक्ष चंद्रशेखर तुपप्पट ,कामठी न प चे माजी उपाध्यक्ष राजेश दुबे,माजी नगरसेवक संजय कनोजिया, कपिल गायधने, सुनील खांनवाणी ,लाला खंडेलवाल सह बरीएम चे विदर्भ महासचिव अजय कदम,उदास बन्सोड,सुभाष सोमकुवर,अनुभव पाटील,तसेच प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट चे संयोजक राजेश गजभिये ,आनंद गेडाम,प्रमोद खोब्रागडे, गीतेश सुखदेवें, कोमल लेंढारे, मंगेश खांडेकर,आशिष मेश्राम,विकास रंगारी, राजन मेश्राम,सुमित गेडाम,कृष्णा पटेल,सलीमभाई,सलमान अब्बास आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.दोन्हीही महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्याला कामठी रेल्वे स्थानकावर थांबा मिळाल्यामुळे कामठीतील नागरिकांसाठी व सैनिकांसाठी फार महत्त्वाचे झाल्यामुळे नागरिकांनी खासदार कृपाल तुमाने यांचे आभार व्यक्त केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ढाब्यावर नोकरी करणाऱ्या चौकीदाराचा अकस्मात मृत्यु

Fri Dec 22 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गुमथळा बोगदयाजवळील बंद पडलेल्या रॉयल हेरिटेज नामक ढाब्यावर चौकीदार पदी कार्यरत असलेल्या इसमाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना गत सायंकाळी साडे पाच दरम्यान घडली असून मृतक इसमाचे नाव अरुण सिंगारे वय 50 वर्षे रा.कोंडाकोसरा जिल्हा भंडारा असे आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com