रामटेक :- राज्यात कोरोणाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे . कोरोणाचा उद्रेक वाढत असतानाच ओमिक्रोन चा ही विळखा घट्ट होत आहे. जिल्ह्यात अचानकच कोरोनाचे वाढते संक्रमण चिंताजनक असून पुढील काही दिवस धोक्याचेच आहेत ,
“स्वतःची जबाबदारी स्वतः घेणे , नवीन व्हेरीयंट चा प्रादुर्भाव लक्षात घेता स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या कोविड नियमांचे पालन करा , दंडात्मक कारवाईची वेळ येऊ देऊ नका असे तहसील कार्यालय रामटेक येथे जिल्हाधिकारी आर.विमला गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. रामटेक तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी आर.विमला यांनी तहसिल कार्यालयात आढावा बैठक घेतली त्यांनी रामटेक तालुक्यात किती लसीकरण झाल आहे ह्याचा आढावा घेतला त्यात , पहिल्या डोझ मद्ये , पि.एच.सी करवाही क्षेत्रात ७४ टक्के ,पी.एच.सी हिवरा बाजार ८८ टक्के , मनसर ८५ टक्के तर शहरात ९९ टक्के, ऐकून रामटेक रामटेक तालुक्यात पहिल्या डोज हा ८९ टक्के झाल आहे..
दुसऱ्या डोज च लसीकरण फक्त ५० टक्के झाल असून , आपल्या स्वतःची व कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे , गर्दीत जाणे टाळावे , यावेळेस फक्त कारवाई करून चालणार नाही तर आपल्या जिवाची काळजी स्वतः घ्यावी लागणार आहे,सर्वांनी नियमांचे पालन करावे असे आव्हान जिल्हाधिकारी आर. विमला यांनी संपूर्ण जनतेला केले आहे….यावेळी उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते , तहसीलदार बाळासाहेब मस्के , न.प मुख्याधिकारी अर्चना वंजारी ,उपस्थित होते.