न्यायालयातुन आरोपीस शिक्षा

नागपूर :- दिनांक ०३.०८.२०२४ रोजी मा. सह जिल्हा न्यायाधीश व अती. सत्र न्यायाधिश तथा विशेष न्यायाधिश पोक्सो कोर्ट आर. पी पांडे यांनी त्यांचे कोर्टाचे केस क. १९४/२०२३ मधील, पोलीस ठाणे पारडी येथील अप. क. ३७९/२०२२ कलम ३५४, ३५४(अ) भा.द.वि., सहकलम ८ पोक्सो अॅक्ट या गुन्हयातील आरोपी डॉ. नायजेल शैलेष वर्गीस, वय २९ वर्ष, रा. कस्तुरबंद पार्क जवळ, नागपूर यांचे विरूध्द साक्षी पुराव्याअंती गुन्हा शाबीत झाल्याने, आरोपीला कलम ३५४ भा.दं.वी अन्वये ०१ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व ६,०००/- रू. दंड आणि दंड न भरल्यास ०१ महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा, तसेच कलम ८ पोक्सो अॅक्ट अन्वये ०३ वर्ष सत्रम कारावासाची शिक्षा व १२,०००/- रू. दंड आणि दंड न भरल्यास ०३ महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली.

दिनांक १९.११.२०२२ चे १२.०० वा. ते ०१.०० वा. चे दरम्यान पोलीस ठाणे शांतीनगर हद्दीत राहणाऱ्या ४१ वर्षीय फिर्यादी यांची १६ वर्षीय अल्पवयीन पिडीत/मुलगी ही पोलीस ठाणे पारडी हद्दीत शाळेत शिकत असतांना तिच्या शाळेत हेल्थ चेकअप कॅम्प असतांना, यातील वर नमुद आरोपीने फिर्यादीचे मुली सोवत हेल्थ चेकअप करतांना अश्लिल चाळे करून तिचे मनास लज्जा येईल असे कृत्य करून फिर्यादीचे मुलीचा विनयभंग केला. फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे पारडी येथे गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर गुन्हयात आरोपीने उच्व न्यायालयातुन अरक पुर्व जामीन मंजूर केला होता.

गुन्हयाचे तपासी अधिकारी तत्कालीन मसपोनि, सुरेखा सागर, यांनी मा. कोर्टात तपासाअंती दोषारोपपत्र सादर केले होते. सदर खटल्यात सरकारी अभियोक्ता महणून अॅड. आसावरी परसोडकर मॅडम यांनी तर, आरोपीतर्फे अॅड. श्री. पि. के सत्यनाथन यांनी काम पाहिले. सदर गुन्ह‌यात कोर्ट पैरवी अधिकारी पोहवा, उमेश मेश्राम व भास्कर बंसोड यांनी काम पाहिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

Sun Aug 4 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीत प्लॉट नं. १४, बेलदारनगर, नरसाळा रोड, नागपूर येथे राहणारे फिर्यादी नामे शुभम महेन्द्र बोकडे, वय ३० वर्षे हे त्यांचे घरा समोरील टाईमन्ब्रेक ई-स्पोर्टस, लाऊंज गेमींग झोन नावाचे दुकान बंद करून घरी गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे दुकानातील मायक्रोसॉफ्ट कंपनीचे एक्स बॉक्स सिरीज सिस्टम, सोनी कंपनीचे पीएस ५ चे तिन सिस्टम, सोनी कंपनीचा एक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com