नागपूर :- फारूख अहमद नजीर अहमद, वय ३२ वर्ष, रा. आठवडी बाजार उमरखेड जि. यवतमाळ (बस ड्राइवर) यांच्या रिपोर्ट वरून पो.स्टे. एमआयडीसी बोरी येथे अप. क्र. ३३०/१७ कलम ३५३, ३२३, ४२७ ३४ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. फिर्यादी हे शासकिय बस क्र. MH-14 / BT-4407 गाडी नागपूर आगार येथून नांदेड करीता जात असता टाकळघाट शिवारामध्ये मागवुन येणारा आयसर क्र. MH-35/K-3766 च्या गाडी चालकाने शासकिय बस ला ओव्हरटेक करून शासकिय बस च्या समोर आपली आयसर गाडी उभी केली. फिर्यादीने मला साईंड का दिली नाही म्हणून नमुद आरोपी नामे- १) जावेद सैय्यद अमजद अली सैय्यद वय ३० वर्ष, २) विजय तातोबा बावरे वय ३२ वर्ष दोन्ही रा. भंडारा यांनी फिर्यादीला हातबुक्कीने व काठीने मारपीट करून शासकिय बसच्या समोरील काच फोडुन नुकसान केले.
सदर प्रकरणाचे तपास पोलीस हवालदार प्रमोद बन्सोड पो.स्टे. एमआयडीसी बोरी यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता मा. जैन अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर कोर्टामध्ये सादर केले. दिनांक ३०/०९/२०२३ रोजी मा. जैन अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांनी वरील सदर गुन्हयातील दोन्ही आरोपीला कलम ३५३, ४२७ ३४ भादवि मध्ये १५०००/ रु. दंड तसेच ३ वर्ष मुदतीचा चांगल्या वर्तणुकीचा बंधनपत्र घेण्यात आलेले आहे. सरकारच्या वतीने ए. पी. पी. गादेवार यांनी काम पाहीले, कोर्ट कामात पैरवी अंमलदार म्हणून पोलीस हवालदार अनिल व्यवहारे पो.स्टे. एमआयडीसी बोरी यांनी मदत केली आहे