जबरी संभोग करणाऱ्या आरोपीला कोर्टातुन शिक्षा

नागपूर :- पो.स्टे. सावनेर फिर्यादी यांच्या रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन सावनेर येथे अप क्र. ३२८/२१ कलम ३५४, ३५४(ड), ३७६ (२) (एन) भांदवि सहकलम ३, ४, ५, ६, ७, ८, ९, १० पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता.

यातील आरोपी नामे- देशलाल संपत भलावी, वय २४ वर्ष रा. हॉटमेंट कॉलनी वाघोडा ता. सावनेर जि. नागपूर हा राहण्यास असून दि. २०/०६/२०२४ रोजी ११/३० वा. फिर्यादीची अल्पवयीन मतिमंद मुलगी ही घराचे बाहेर गेली असतांना तिचा फिर्यादीने शोध घेतला नंतर ती १४.३० वा. मिळून आली. त्यावेळी तिचे अंगावरील कपडे फाटलेले होते तसेच कपडयांवर चिखल लागलेला असल्याने फिर्यादीने तिचेकडे विचारपूस केली असतांना पिडीताने सांगीतले की आरोपी याने तिला हॉटमेन्ट कॉलनी जवळ नाल्यापाशी नेवून जबरी संभोग केला तसेच पाठीवर मारहाण केली असे सांगितले. फिर्यादीची रिपोर्ट वरून गुन्हा नोंद करण्यात आला. नंतर पिडीतेला वैद्यकीय तपासणीसाठी मेयो रुग्णालय, नागपूर येथे पाठविले असता, तिचे सोबत बलात्कार झाल्याने डॉक्टरांनी अभिप्राय दिल्याने फिर्यादीचे पुरवणी बयाण घेवून गुन्हयात कलम वाढ करण्यात आली.

सदर प्रकरणाचे तपास सपोनि सोनाली रासकर यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता मा. न्यायालयात दाखल केले होते. सदर प्रकरणात मा. डीजे ११ एस. एस. नागुर यांनी दिनांक २५/१०/२०२४ रोजी वरील नमुद आरोपीस कलम ०६ पोक्सो मध्ये २० वर्षे सश्रम कारावास व १०,०००/रू दंड, दंड न भरल्यास ०६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा अशी शिक्षा ठोठावली आहे.

सरकारचे वतीने एपीपी सायखेडकर यांनी काम पाहीले. कोर्ट कामात पैरवी अंमलदार म्हणून पोहवा मधुकर आदमने यांनी मदत केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विधानसभा निवडणूक संबंधाने पोलीस स्टेशन MIDC बुट्टीबोरी अंतर्गत रूटमार्च

Sat Oct 26 , 2024
बुट्टीबोरी :- पोलीस स्टेशन MIDC बुट्टीबोरी अंतर्गत आज दिनांक २५/१०/२०२४ रोजीचे १६/०० ते १७/०० वा पर्यंत विधानसभा निवडणूक संबंधाने दीपक अग्रवाल (भा.पो.से.) उपविभागीय पोलीस अधिकारी नागपूर विभाग नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली रूटमार्च दरम्यान टाकळघाट शिवाजी चौक, महाजन चौक गजानन महाराज मंदिर अमर विद्यालय बस स्टॉप टाकळघाट मेन रोड टाकळघाट खापरी मोरेश्वर चौक टाकळघाट परत शिवाजी बौक टाकळघाट येथील पोलीस अधिकारी यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!