पुण्यातील दुर्घटनेतील मजुरांच्या मृत्यूवर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

जखमींना तत्काळ उपचार, कुटुंबियांना मदतीचे निर्देश

मुंबई, दि. ४:- पुण्यात येरवडा परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने झालेल्या मजुरांच्या मृत्यूवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. दुर्घटनेतील जखमींना चांगले उपचार मिळावेत तसेच मृतांच्या आणि जखमींच्या कुटुंबियांना आवश्यक ती सर्व मदत करण्याबाबत त्यांनी यंत्रणांना निर्देश दिले आहेत.

इमारतींचे बांधकाम तसेच अन्य कामांच्या ठिकाणीही जीवितहानी होऊ नये, यासाठीच्या सुरक्षा उपाय योजनांची खबरदारी घेण्यात यावी. त्याबाबत संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. दुर्घटनेतील जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रति मुख्यमंत्र्यांनी सहवेदना प्रकट केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

महा मेट्रोने स्थापित केला इतिहास : ८०० टन वजनाचे स्ट्रकचर रेल्वे ट्रॅकवर लॉंच

Fri Feb 4 , 2022
नागपूर  : तांत्रिक दृष्टया अतिशय कठीण आणि आव्हानात्मक समजले जाणारे गड्डीगोदाम (गुरुद्वारा) येथे ४ स्तरीय वाहतूक व्यवस्था महा मेट्रो निर्माण करत असून शुक्रवारच्या मध्यरात्री भारतीय रेल्वे ट्रॅकच्यावर ८० मीटर लांब व ८०० टन वजनाचे स्टील गर्डर महा मेट्रोने यशस्वीरीत्या लॉंच केले असून नागपूर शहराच्या इतिहासात एवढ्या मोठ्या कार्याची निश्चितच नोंद झाली आहे. गर्डर लॉंचिंग होताच रेकॉर्ड झाले स्थापित : भारतीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com