नागपूर :- शनिवार दि.२७ रोजी कवी दशरथपंत नारायणराव अतकरी वेलतूर, नागपूर यांच्या स्वलीखीत संस्कारधारा या विविधांगी विविध आशयसंपन्न काव्यसंग्रहाचे प्रकाशन विदर्भ हिंदी साहित्य संमेलन, उत्कर्ष सभागृह,राणी झाशी चौक सिताबर्डी नागपूर येथे अगदी थाटामाटात प्रकाशन संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध उद्योजक तथा अध्यक्ष, आंभोरा देवस्थान आंभोरा रत्नाकर ठवकर होते. सुप्रसिध्द कादंबरीकार तथा.अध्यक्ष ९७ वे अ.भा.मराठी साहित्य संमेलन, अमळनेर डाॅ. रवीन्द्र शोभणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. नवप्रकाशीत संस्कारधारा काव्यसंग्रहावर सखोल भाष्य, चिकीत्सक भाष्य सुप्रसिद्ध जेष्ठ समीक्षक प्रा.डॉ. राजेन्द्र नाईकवाडे नागपूर विद्यापीठ मराठी प्राध्यापक संमेलन यांनी संस्कारधारा कविसंग्रहावर चौफेर भाष्य केले. संस्कारधारा काव्यसंग्रहास अक्षर जुळवनी व मुद्रण करून प्रकाशनास तयार करून देणारे हे. लाखे प्रकाशनाचे चंद्रकांत लाखे नागपूर यांच्या उपस्थितीत संस्कारधारा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आटोपले शेवटी अध्यक्ष रत्नाकर ठवकर यांचे अध्यक्षीय भाषण झाले. या प्रकाशन सोहळ्यास विदर्भ साहित्य मंडळ शाखेचे सर्व कवी व कवयित्रीं हजर होत्या. सर्वांनी शांततेत मान्यवरांचे मार्गदर्शन वा याविषयीचे मत ऐकून घेतले. शेवटी कवी दशरथपंत अतकरी यांच्या जेष्ठ स्नुषा प्रियंका अतकरी यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. सर्व मंडळींनी या काव्यसंग्रहाचे मुक्तकंठाने स्तुती केली.