प्रज्ञेची क्रांतीस्थळे पुस्तकाचे प्रकाशन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

नागपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पाउलखुना उमटलेल्या स्थळांचा माहितीचे संकलन करुण एकुण 50 स्थळाचा समावेश असलेल्या ’प्रज्ञेची क्रांतीस्थळे ‘ या सामाजिक कार्यकर्ते राजकुमार वंजारी लिखित पुस्तकाचे प्रकाशन पुस्तकात आहे. मंगळवार दि.08 ऑक्टोबर 2024 रोजी विदर्भ हिंदी साहित्य संम्हेलन मोर भवन नागपूर येथील नटराज सभागृहात उत्साहात पार पडले. स्त्रीभूषण रमाई आंबेडकर संस्थे तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थांनी भदंत नागदिपंकर महाथेरो होते. मार्गदर्शक भदंत संघरत्न मानके होते प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार नानाजी शामकूळे,माजी आमदार उपेंद्र शेंडे, वरिष्ठ पत्रकार अनिल वासनिक,मंचावर राजकुमार वंजारी, विलास गजभिये,अमोल शामकूळे, उपस्थित होते सर्व प्रथम भगवान बुद्ध,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रमाई आंबेडकर, व बॅरिं.राजाभाऊ खोब्रागडे यांच्या प्रतिमे समोर माल्यार्पन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या वेळी सर्व पाहूण्यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

प्रस्ताविक लेखक राजकुमार वंजारी यांनी केले आणि पुस्तक निर्मिती मागील भुमिका विषद केली या प्रसंगी नानाजी शामकूळे, उपेंद्र शेंडे,अनिल वासनिक यांनी पुस्तकावर भाष्य केले कार्यक्रमाचे अध्यक्ष भदंत नागदिपंकर, यांनी जनतेला नविन इतिहास आणि स्थळांची माहिती मिळणार असल्याचे सांगितले कार्यक्रमास भदंत संघरत्न मानके यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन विलास गजभिये यांनी केले आभार प्रदेशन हरिदास बेलेकर,यांनी केले कार्यक्रमास दिलीप तांदळे, दिलीप सोनडवले,कृष्णा बोरकर,रमेश ढवळे,प्रियंका देशपांडे, वंदना निकोसे,प्रगती पारसी,मीरा मदनकर,चंद्रभान भोवते, प्रा.मुंकुद मेश्राम, कवि मनोहर गजभिये, ज्ञानदेव गजभिये, अश्विन पिलेवार, विलास पिलेवान, कवि मनोहर गजभीये व धर्मपाल वंजारी यांचा सह मोठया संखेत कार्यकते उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

"पर्यटन, रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधांमध्ये भारताच्या गुंतवणुकीचे स्वागत करू" - अध्यक्ष मोहमद मुइझ्झु

Wed Oct 9 , 2024
– चित्रपट आणि टीव्ही सिरीयल निर्मात्यांचे देखील मालदीवमध्ये स्वागत मुंबई :- मुंबई हे भारताचे आर्थिक केंद्र असून महाराष्ट्रात विविध क्षेत्रांमध्ये व्यवसायाची मोठी क्षमता असल्याचे सांगून मालदीव भारताकडून पर्यटन, रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा क्षेत्रामधील गुंतवणुकीचे स्वागत करेल, असे प्रतिपादन मालदीवचे अध्यक्ष डॉ मोहमद मुइझ्झु यांनी आज येथे केले. या संदर्भात उभय देशांनी दिल्ली येथे स्वीकारलेले ‘व्हिजन डॉक्युमेंट’ भारत आणि मालदीवमधील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com