नाभिक समाजाचा नितीन गडकरी यांना जाहीर पाठींबा

– २०२४ ची लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात भारतीय जनता पक्षाचे नितीन जयराम गडकरी यांना आज झालेल्या महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या बैठकीत समाज बांधवांच्या वतीने एकमताने जाहीर पाठींबा चा ठराव पारित करण्यात आला

नागपूर :- महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवी बेलपत्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत समाज नेते सुरेश एस चौधरी, नागपूर जिल्हाध्यक्ष  सतीश तलवारकर, प्रदेश सचिव डॉ. संतोष मैदनकर, नागपूर जिल्हा महिला अध्यक्ष अनाघा चौधरी, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुनील इलोरकर, विभागीय अध्यक्ष प्रकाश द्रव्यकार, संपर्क प्रमुख एड. अमोल अलोने, आनंदराव येसकर, अशोक कोठेकर, मोहन मिरासे, आनंद आंबोलकर, गोपिचंद लक्षणे, मिथुन चौधरी, सौ. सारिका चावके यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

विकासाची दूरदृष्टी सुसंस्कृत राजकारण निर्वाचन क्षेत्राचा विकास, एवढेच नव्हे तर देशात नागपूर शहराला मानाचं स्थान मागिल दहा वर्षांत  नितीनजींच्या कार्यशैली ने प्राप्त झाले. समाजातील उन्नती करता धर्म,जात, पंत, समस्याग्रस्त प्रश्नाबाबत माननीय नितीन गडकरी यांच्या जिव्हाळा, प्रेम व नागपूरवासीय सुसंस्कृत राजकारणी म्हणून त्यांच्याबाबत असलेला सार्थ अभिमान हे लक्षात घेऊन समस्त नाभिक बांधवांच्या उपस्थितीत नितीन गडकरी यांना महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा सन्मानपूर्वक जाहीर पाठिंबा देऊन प्रचंड मता ने विजयी होणार असा आत्मविश्वास मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या समाज बांधवांनी व्यक्त केला. पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करून माननीय प्रदेशाध्यक्ष रवि बेलपत्रे यांनी कार्यकारिणी व नाभिक समाजाच्या वतीने जाहीर पाठींबा चे एक पत्रक आज दुपारी नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी सोपविले. गडकरींनी आस्थेने विचारपूस करुन निवडणुकीत कार्याला सुरुवात करावी असे मत व्यक्त केले. शेवटी छोटेखानी कार्यक्रमात नागपूर जिल्हाध्यक्ष सतीश तलवारकर यांनी आभार व्यक्त केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

माहिती संचालक गणेश रामदासी सेवानिवृत्त ; संचालक कार्यालयातर्फे निरोप

Sun Mar 31 , 2024
नागपूर दि. ३१ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभागाचे संचालक गणेश रामदासी हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असून त्यांना कार्यालयाच्यावतीने निरोप देण्यात आला. माहिती संचालक कार्यालयात आयोजित निरोपसमारंभास माध्यम समन्वय अधिकारी अनिल गडेकर, सहायक संचालक पल्लवी धारव, विभागीय माहिती केंद्राचे प्र.जिल्हा माहिती अधिकारी रितेश भुयार यांच्यासह संचालक कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय आणि विभागीय माहिती केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 माहिती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com