मुंबई हायकोर्टात जनहित याचिका, पक्षातून फुटलेल्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही

मुंबई :- महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या दोन वर्षात दोन वेळा राजकीय भूकंप झाला. दोन मोठे पक्ष फुटले. पक्ष फुटल्यानंतर आमदार दुसऱ्या पक्षात सहभागी झाले नाहीत. त्यांनी थेट मूळ पक्षावरच दावा सांगितला. हा विषय निवडणूक आयोगाकडे गेला. महाराष्ट्राप्रमाणे देशातील अन्य राजकीय पक्षातही काही प्रमाणात फूट पडली आहे. मात्र याच पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. यात जे पक्षातून फुटले आहेत, किंवा फुटतात त्यांना पदावरून तात्काळ दूर करण्यात यावे, त्याच प्रमाणे भारतीय घटनेच्या शेड्युल 10च पॅरा क्रमांक 4 हटवण्यात यावा,अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसात महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष फुटीच्या घटना घडल्या आहेत. प्रथम शिवसेना पक्षात फूट पडली. शिवसेनेचे 40 आमदार पक्षातून बाहेर पडले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. त्यांचे ही जवळपास 40 आमदार फुटले आहेत.

पक्षांतरास प्रोत्साहन देणार कलम कुठलं?

देशात पक्षांतर बंदी कायदा आहे. मात्र, या कायद्याच शेड्युल 10 च मुद्दा क्रमांक 4 हे पक्षांतरास प्रोत्साहन देणार कलम आहे. त्यामुळे हे कलम रद्द कराव, अशी याचिकेत मागणी केली आहे. महत्वाचा या याचिकेत आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे. तो म्हणजे ज्यांनी पक्षांतर केलं आहे. मात्र ज्यांनी शेड्युल 10 च पालन केले नाही. त्यांना कोणत्याही पदावर राहण्याचा अधिकार नाही. घटनेच्या शेड्युल 10 नुसार 2/3 आमदार पक्षातून बाहेर पडू शकतात. मात्र, बाहेर पडल्यावर त्यांना इतर कोणत्या तरी पक्षात जावं लागत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सीटों का बंटवारा-बेहतर तालमेल-कन्वीनर, मुंबई में INDIA की बैठक में क्या-क्या होंगे एजेंडे

Tue Aug 29 , 2023
मुंबई :- लोकसभा चुनाव 2024 में बीजेपी से मुकाबला करने के लिए विपक्षी गठबंधन INDIA अपनी रणनीति बनाने में जुटा है. पटना और बेंगलुरु के बाद विपक्षी गठबंधन INDIA की तीसरी बैठक मुंबई में 31 अगस्त और 1 सितंबर को होने जा रही. विपक्षी के लिहाज से मुंबई की बैठक काफी महत्वपूर्ण मानी जा रही है, जिसके लिए एजेंडा और […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com