पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे कर्मयोगी संत गाडगे बाबांना आदरांजली
नागपूर / मुंबई – कर्मयोगी संत गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे थोर समाजसुधारक होते. दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करून त्यांनी माणसातील अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून दिली. जन कल्याणकारी असलेल्या या थोर संताने संपूर्ण महाराष्ट्रातील गावोगावी फिरून विवेकाच्या खराट्याने लोकांची मने स्वच्छ केली. खेडोपाडी आणि शहरात जाऊन कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी स्वच्छतेसह शिक्षणाचे महत्व लोकांना पटवून दिले. लोकशिक्षणाचे चालते बोलते विद्यापीठाचे जनक असलेल्या संत गाडगे महारांजाचा मार्ग प्रत्येकाने अंगिकारावा, असल्याचे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी केले. कर्मयोगी संत गाडगे महाराज यांच्या 148 व्या जयंतीनिमित्त राजाबाक्षा येथील गाडगे बाबांच्या पुर्णाकृती पुतळयाला पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे आदरांजली वाहण्यात आली. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या हस्ते पुतळयाला माल्यापर्ण करण्यात आले. पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या अभिवादन सभेत जयदीप कवाडे हे बोलत होते, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश संघटक कपील लिंगायत यांनी दिली.
पुढे बोलतांना जयदीप कवाडे म्हणाले की, डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके अश्या साध्या वेशात असलेल्याया राष्ट्रसंताने देशात विज्ञानवादी समाजक्रांती घडविली. रंजले- गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच देव असल्याचे ते ठासून सांगायचे. या राष्ट्रसंताला लोकांकडून मिळालेल्या देणगीच्या पैशातून त्यांनी रंजल्या- गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम व विद्यालये सुरू केली. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्याचे काम त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत केल्याचेही जयदीप कवाडे यावेळी म्हणाले. अभिवादन सभेला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश संघटक कपील लिंगायत, ओबीसी सेल शहराध्यक्ष विपीन गाडगीलवार, भीमराव कळमकर, सुहास तिरपुडे, गौतम गुघरे, अंकित डोंगरे, शकुंतला मेश्राम, पीयूुष हलमारेसह शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यकर्त्यांची उपस्थिती होती, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकातून दिली पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश संघटक कपील लिंगायत यांनी दिली
लोकशिक्षणाचे चालते बोलते विद्यापीठ असलेल्या गाडगेबाबांचा मार्ग अंगिकारा-जयदीप कवाडे
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com