संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 24:-महाराष्ट्र राज्यात विधानपरिषद निवडणुकीच्या निवड प्रक्रियेनंतर 20 जून च्या रात्रीपासून शिवसेनेच्या शिंदे गटाने सुरतमध्ये पोहोचून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपशी जुळवून घेण्यासाठी बंड पुकारल्या नंतर महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये सत्तासमिकरणावरून मागील चार दिवसांपासून संभ्रमाची तशीच आव्हानात्मक स्थिती निर्माण झाली असून यामध्ये कामठी शहरातील राजकीय पदाधिकारी,कार्यकर्तेसह राज्याच्या राजकारणात रस बाळगून असलेले नागरिक गण टीव्ही समोर तासनतास बसून ब्रेकिंग न्यूज बघताहेत , एक प्रकारची काय होणार?ही धुंदच लागली आहे इतकेच नव्हे तर राज्याच्या राजकीय उलथापालथीची कामठी च्या चौका चौकात ‘चाय पे चर्चा’ करीत चर्चेला जोम देत तर्क वितर्क लावण्यात येत असून सर्वत्र राज्याच्या राजकीय उलथापालथीचा हा एकच चर्चेचा विषय असून कित्येकजण या चर्चेतून अस्वस्थ असल्याचे दिसून येत आहेत. कित्येकजण सरकार पडणार या चर्चेतून कित्येकांच्या चेहऱ्यावर ‘कही खुशी कही गम …’अशीही चित्रात्मक स्थिती दिसून येत आहे.
विधानपरिषदच्या निवडणुकीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांचा गट 20 जून रोजी रात्री सुरत येथे पोहोचताच 21 जून च्या सकाळपासून राज्याच्या राजकारणामध्ये वादळ उठले .एकनाथ शिंदे गटाकडे आमदार संख्याबळ वाढत असल्याचे दिसुन येत असून अपक्ष आमदारांनीही शिंदे गटाला पाठींबा दिला.एक दोन नव्हे तर तब्बल 40 पेक्षा जास्त आमदार येथून एकनाथ शिंदे गटात जुडल्याने कांग्रेस -राष्ट्रवादीत अस्वस्थता निर्माण झाली आहे ..एकीकडे एकनाथ शिंदे गटाचे आमदार संख्याबळ चे शक्तिप्रदर्शन तर दुसरीकडे पक्षाकडून पक्षादेश झुगारने यावरून सदस्यत्व रद्द, गटनेता पद बदलणे, मुख्य प्रतोद बदलणे या सर्व राजकीय घडामोडित राजकोय मंडळीसह सर्वसामान्य नागरिकांचे महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार की तारणार?याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.